शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

नांदपूरच्या कॅफेटरियामध्ये पशुचाऱ्यांच्या २४ प्रजाती

By admin | Updated: August 27, 2015 02:23 IST

वर्षभर जनावरांसाठी चारा आणायचा कुठून, असा प्रश्न नेहमीच शेतकऱ्यांना भेडसावत असतो.

पशुपालकांना आधार : पशुवैद्यकीय दवाखान्यात साकारला राज्यातील पहिला फॉडर कॅफेटरियावर्धा : वर्षभर जनावरांसाठी चारा आणायचा कुठून, असा प्रश्न नेहमीच शेतकऱ्यांना भेडसावत असतो. चाऱ्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकडे असलेल्या दुधाळ जनावरांच्या योग्य संवर्धनासाठी हिरव्या चाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी जिल्ह्यातील नांदपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात २४ प्रकारच्या पशुचाऱ्याची लागवड करण्यात आली आहे.‘फॉडर कॅफेटरिया’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध चाऱ्यांचे प्रकार उपलब्ध झाले आहेत. गरजेनुसार शेतकरी येथून शेतात लागवडीसाठी चारा घेऊन जाऊ शकतात. हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून जनावरांच्या संगोपनाला यामुळे चालना मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. सतीश राजू यांच्या संकल्पनेतून हा कॅफेटारिया साकार झाला आहे. जनावरांचे संगोपन करताना चाऱ्याचा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांना भेडसावत असतो. योग्य चारा मिळत नसल्याने जनावरांच्या आरोग्यासोबतच दूध उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो. यामुळेच देशाच्या विविध भागात पशु आहारासाठी वापरण्यात येत असलेल्या गवताच्या प्रजातीचा अभ्यास करून २४ प्रकारच्या हिरव्या चाऱ्याच्या प्रजाती संकलित करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी चाऱ्याच्या विविध प्रजाती प्रत्यक्ष बघता याव्यात तसेच लागवडीयोग्य क्षेत्रात चाऱ्याची निर्मिती करून पशुधन पाळता यावे, यासाठी चाऱ्याचे बियाणे पशुसंवर्धन विभागातर्फे उपलब्ध करून देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. शेतकरी साधारणत: मका, कडबा, बर्लिम, लसून याचप्रकारे पौष्टिक गवत चारा म्हणून वापरतात. हे केवळ विशिष्ट काळातच उपलब्ध होते. टंचाई परिस्थितीत तसेच उन्हाळ्यात पशुपालकांना चाऱ्यासाठी कसरत करावी लागते. नांदपूर येथे पशुवैद्यकीय २४ प्रकारच्या चाऱ्याच्या प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. यासाठी झाशी येथील ‘इंडियन ग्रास लॅन्ड अ‍ॅण्ड रिसर्च इंन्स्टिट्यूट हैदराबाद’ येथील ‘रिजनल स्टेशन फॉर फॉडर डेमॉन्स्ट्रेशन अ‍ॅण्ड प्रपोगेशन’ तसेच पुण्याच्या ‘बायफ’ संस्थेसह देशातील इतर भागातूनही चाऱ्याच्या प्रजाती संकलित करण्यात आल्या आहेत. यासाठी पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. सतीश राजू, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिरूद्ध पाठक तसेच त्यांचे सहायक जाने, महेबूब शेख यांनी ही प्रयोगशाळा यशस्वीपणे सुरू केली. जनावरांसाठी बाराही महिने चारा उपलब्ध करून देण्याचा वर्धा येथील हा राज्यात बहुदा पहिलाच प्रयोग आहे.(कार्यालय प्रतिनिधी)