बचत खात्यातून २२ हजार लंपास

By Admin | Updated: June 8, 2014 00:04 IST2014-06-08T00:04:44+5:302014-06-08T00:04:44+5:30

बँकेतून बोलतो असे सांगत एटीएमचा कोड माहिती करून येथील विलास नत्थूजी नक्षीणे यांच्या सेलू येथील स्टेट बँकेतून बचत खात्यातून २२ हजार रुपयांची परस्पर उचल झाल्याची घटना घडली.

22 thousand laps from savings account | बचत खात्यातून २२ हजार लंपास

बचत खात्यातून २२ हजार लंपास

घोराड :  बँकेतून बोलतो असे सांगत एटीएमचा कोड माहिती करून येथील विलास नत्थूजी नक्षीणे यांच्या सेलू येथील स्टेट बँकेतून बचत  खात्यातून २२ हजार रुपयांची परस्पर उचल झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २८ मे रोजी विलासला  स्टेट बँक ऑफ इंडियामधून बोलत आहे., तुमचा एटीएमचा कोड लॉक झाला आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन कोड देण्यात येत आहे. कृपया आपला कोड सांगावा, या आशयाचे बोलणे करणारा भ्रमणध्वनी आला. यावर विश्‍वास ठेवत विलासने एटीएमचा कोड सांगितला. विलास ६ जूनला त्याच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेला असता रक्कम मिळत नव्हती. या बचत खात्यात पैसे नसल्याचे दर्शवित असल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी मिळविलेल्या तपशील नुसार २८ मे, २९ मे व २ जूनला या बचत खात्यातून एकूण २२ हजार रुपयांची उचल केल्याचे कळले. हे पैसे कुणी काढले असावे, असा विचार केल्यानंतर त्यांना मोबाईलवर कोड नंबर विचारल्याचे लक्षात आले. त्यांनी सेलू पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मात्र त्याला आलेला भ्रमणध्वनी क्रमांक लक्षात नसल्याने तपासाला गती आली नाही.(वार्ताहर)
 

Web Title: 22 thousand laps from savings account