शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

१८ दिवसांत जिल्ह्यात झाली केवळ १२ हजार व्यक्तींची कोविड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, १ ते १८ नोव्हेंबर या काळात सर्वाधिक कोविड टेस्ट ४ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवशी तब्बल १ हजार २८४ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेवून त्याचे विश्लेशन करण्यात आले. तर सर्वात कमी टेस्ट १५ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवळी केवळ ८४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली होती. जिल्ह्यात सध्या ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून कोरोनाशी लढा दिला जात आहे.

ठळक मुद्दे१५ व्यक्तींचा घेतला कोरोनाने बळी : कोरोना टेस्टची संख्या कमीच

  लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दिवाळीचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मुळगावी परतले. याच काळात कोविड टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढेल अशी आशा होती. पण अनेक व्यक्ती कोरोना काळातील खबरदारीचे उपायांची अंमलबजावणी करीत वर्धा जिल्ह्यात परतल्याने १ ते १८ नोव्हेंबर या काळात जिल्ह्यात केवळ ११ हजार ९३४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे या दिवसांत कोविड चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढेल असे गृहीत धरून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार, १ ते १८ नोव्हेंबर या काळात सर्वाधिक कोविड टेस्ट ४ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवशी तब्बल १ हजार २८४ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेवून त्याचे विश्लेशन करण्यात आले. तर सर्वात कमी टेस्ट १५ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवळी केवळ ८४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली होती. जिल्ह्यात सध्या ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून कोरोनाशी लढा दिला जात आहे.असे असले तरी याच १८ दिवसांच्या काळात कोरोनाने जिल्ह्यातील १५ व्यक्तींचा बळी घेतला आहे. यात १४ पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे.  नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीच्या १८ दिवसांत ११ हजार ९३४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ८३१ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. या नवीन कोविड बाधितांमध्ये ५१६ पुरुष तर ३१५ स्त्री कोविड बाधितांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. एकूणच जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग सध्या पुरुषांना होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुण आणि वृद्ध पुरुषांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

टेस्टींग सेंटरवर होती संशयितांची कमी-अधिक गर्दी

 दिवाळीच्या निमित्ताने मुळ गावी परतल्यावर बदललेल्या वातावरणाचा अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम पडला. यात काहींना ताप, सर्दी, खोकला झाल्याने त्यांनी जिल्ह्यातील कोविड टेस्टींग सेंटरवर जात कोविड चाचणी केली. 

 कोविड टेस्टींग सेंटरवर नागरिकांची गर्दी वाढू शकते अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे या सेंटरवर अतिरिक्त मनुष्यबळ कार्यरत होते. शिवाय या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याबाबत सूचनाही दिल्या जात होत्या.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या