शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

१५.१४ लाखांचे तांबे पळविणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 5:00 AM

जाम येथील पी.व्ही. टेस्क टाइल्स कंपनीतून चोरट्यांनी १५ लाख १४ हजार ७३४ रुपये किमतीचे तांब्याच्या ताराचे रोल चोरून नेल्याची तक्रार सुरक्षाप्रमुख अमोल रामचंद्र पवार यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूकडून करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जाम येथील टेक्सटाइल्स कंपनीतून तब्बल १५.१४ लाखांचा तांबा ताराचे रोल चोरून नेणाऱ्या टोळीतील नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर फरार असलेल्या तब्बल सहा आरोपींचा शोध सध्या घेतला जात आहे. या चोरट्यांकडूनपोलिसांनी १४ लाख ५६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.जाम येथील पी.व्ही. टेस्क टाइल्स कंपनीतून चोरट्यांनी १५ लाख १४ हजार ७३४ रुपये किमतीचे तांब्याच्या ताराचे रोल चोरून नेल्याची तक्रार सुरक्षाप्रमुख अमोल रामचंद्र पवार यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूकडून करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर येथील चोरट्यांच्या टोळीतील नऊ व्यक्तींना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. प्रतीक ऊर्फ लाला सुरेश शिंदे (२५), गुड्डू श्रीपाल निषाद (२१), पवन देवी निशाद (२९), विकास सुभाष ढोके (२१), भारत देवी निशाद (२१), छोटेलाल श्रीपाल निशाद (२५), राकेश सुदेश शर्मा (३६), अशोक पोचा परचाके (१९) व मो. इजाज अब्दुल रहमान (५५), सर्व रा. चंद्रपूर असे पोलिसांनी ताब्यात घेत अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर नौशाद कुरेशी, कौसर, कमलेश यादव, सलमान चौघे रा. घुग्गुस आणि बबलू निशाद व अनिल निशाद दोन्ही रा. चंद्रपूर अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहेत. फरार आरोपींनाही लवकर अटक करू, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

१४.५६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त-    सदर चोरट्यांकडून पोलिसांनी १४.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात १ लाख ६७ हजार २०० रुपयांचा २०९ किलो तांब्याचा तार, ९ हजार ७६० रुपये किमतीचा जीआय तार व प्लास्टिक केबल, ३० हजार रुपये किमतीचे सहा मोबाइल तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या चार वाहनांचा समावेश आहे.

चंद्रपूर पोलिसांचे सहकार्य राहिले मोलाचे-    सदर गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर चंद्रपूर पोलीस विभागातील फौंजदार संदीप कापडे, संदीप मुळे, नागोसे, चौहान यांनी वर्धा पोलिसांना मदत केली. एकूणच चंद्रपूर पोलिसांचे सहकार्य या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात मोलाचेच राहिले. 

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस