सेवा व्यावसायिकांना १४४.३० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:32+5:30

जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे या सर्व व्यवसायांवर संक्रांत आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संचारबदी लागू असल्याने सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.

144.30 crore hit to service professionals | सेवा व्यावसायिकांना १४४.३० कोटींचा फटका

सेवा व्यावसायिकांना १४४.३० कोटींचा फटका

Next
ठळक मुद्देव्यावसायिकांची उपासमार : आता सण, उत्सवांवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे गेल्या सहा महिन्यांपासून विवाह सोहळे, समारंभ आदी सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. परिणामी, मंगल कार्यालये, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस व इलेक्ट्रिक यासह संबंधित इतर सेवा व्यवसायही ठप्प आहेत. त्यामुळे एकट्या वर्धा जिल्ह्यात १४४ कोटी ३० लाख रुपयांच्या फटक्याने अर्थचक्र प्रभावित झाले आहे.
जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे या सर्व व्यवसायांवर संक्रांत आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संचारबदी लागू असल्याने सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी विवाह सोहळे व समारंभाला मुकावे लागले तर आता सण, उत्सवाच्या आयोजनावरही मर्यादा घालण्यात आल्याने या सेवा व्यावसायिकांच्या संकटात आणखीच भर पडली आहे. विशेषत: या व्यवसायाशी संलग्न असलेले वाजंत्री, डोलीवाले, रांगोळी, फोटोग्राफर, ब्युटीपार्लर, वेटर, मोलकरीण, साफसफाई कर्मचारी आदींसह हजारोंचे रोजगार हिरावल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

अनेकांनी मोलमजुरीचा निवडला पर्याय
जिल्ह्यातील सेवा व्यावसायिकांपैकी ७५ टक्के व्यावसायिक हे ग्रामीण भागातील असून त्यांनी या व्यवसायातून स्वयंरोजगार उभारला आहे. ते स्वत: मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस, इलेक्ट्रिकचे काम करतात. खड्डा खोदण्यापासून तर बल्ली गाडून पडदा लावण्याचेही काम ते स्वत: करीत असल्याने या लॉकडाऊनच्या काळात त्यांचास्वयंरोजगारच ठप्प पडला आहे. याचाच परिणाम या व्यवसायातील मजुरांवरही झाला आहे. मंडप कारागीर आणि या व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांना मोलमजुरी करावी लागत आहे.

सेवा व्यावसायिकनिहाय झालेले नुकसान
कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात १ हजारावर असलेल्या सेवा व्यावसायिकांचे यंदा जवळपास दीडशे कोटींचे नुकसान झाले आहे. अनेकांनी व्यवसायाकरिता कर्ज घेतले असून त्यांचे हप्ते थकल्याने बँकांकडून नोटीस येत आहेत. शासनाच्या आदेशाने हप्ते थांबविण्यात आले असून व्याज मात्र, सुरूच आहे. या काळात व्याजाचेही चक्र जोरात असल्याने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. विशेषत: या व्यवसायावर अवलंबून असणाºया इतर दुर्लक्षित कामगारांचा पोटमारा झाला आहे. ग्रामीण भागात या व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभारणाऱ्यांची मोठी वाताहत झाली आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे.
संजय ठाकरे, सचिव, वर्धा सेवा समिती.

Web Title: 144.30 crore hit to service professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.