चिनी नायलॉन मांजाने १४ जण झाले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:17+5:30

पशुपक्ष्यांसह माणसेही जखमी होत असल्याने या मांज्याच्या विक्रीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली तरी अद्याप शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यातच सायंकाळी पाच वाजतापासून संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आल्याने दररोज बाजारपेठेतील दुकानेही बंद होतात. त्यामुळे विरंगुळा म्हणून पतंग उडविण्याचे फॅड आले.

14 injured by Chinese nylon Manja | चिनी नायलॉन मांजाने १४ जण झाले जखमी

चिनी नायलॉन मांजाने १४ जण झाले जखमी

Next
ठळक मुद्देआठवडाभरातील घटना : पशुपक्ष्यांनाही गंभीर इजा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बंदी घातलेल्या चिनी मांज्यामुळे शहरासह जिल्ह्यात दररोज शेकडो अपघात होत असून आतापर्यंत १४ जण जखमी झाले आहे. पशुपक्ष्यांसह माणसेही जखमी होत असल्याने या मांज्याच्या विक्रीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली तरी अद्याप शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यातच सायंकाळी पाच वाजतापासून संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आल्याने दररोज बाजारपेठेतील दुकानेही बंद होतात. त्यामुळे विरंगुळा म्हणून पतंग उडविण्याचे फॅड आले. आहे. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जणू सर्वांनाच पतंगज्वर चढला आहे. सायंकाळी बच्चे कंपनी, युवक, एवढेच नव्हे तर आबालवृद्धही पतंग उडविण्याचा आनंद लुटताना दिसतात. मात्र, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायजलॉनचा चिनी मांजा नागरिकांच्या जिवावर उठला आहे.
वो काट..चा सामना सायंकाळी आकाशात रंगतो. यात कुणाची तरी पतंगी कापली जाते आणि ती पकडण्यासाठी बच्चे कंपनी आणि युवक जिवाचे रान करताना दिसतात. याच दरम्यान पतंगीला असलेला मांजा कुणाच्या गळ्यात अडकतो. दोन दिवसांपूर्वी आर्वी नाक्यावर या मांज्यामुळे दुचाकीला अपघात झाला. तर बॅचलर रोडवर दुचाकीने आदिल अजानी (२३) हा गंभीररीत्या जखमी झाला. तर पावडे चौकाकडे जाणाऱ्या बॅचलर रोडवर युवकांमध्ये हाणामारी झाली. आठवडाभरात या मांजामुळे १४ जण जखमी झालेत. चिनी बनावटीच्या या मांजामुळे मागील काही दिवसांपासून पशु-पक्ष्यांसह माणसेही जखमी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आला, मात्र, या मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही सर्रास वापरात आणला जात आहे. तरी पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यापैकी कुणीही कारवाईसाठी पुढाकार घेतला नसल्याने मांजावरील बंदीची अंमलबजावणीबद्दल अनास्था दिसून येत आहे.

नायलॉन मांजाचा वाढला वापर
काही वर्षांपूर्वी पतंग उडविण्यासाठी साध्या सुती दोऱ्याचा वापर केला जात होता. हा दोरा तुटत असल्याने आणि ‘वो काट’च्या स्पर्धेत विरोधकांचा पतंग कापण्यासाठी, आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चिनी, नायलॉनच्या मांजाचा वापर वाढला. नायलॉनच्या दोऱ्यावर डिंकाचा वापर करून काचेचा चुरा लावण्यात येतो. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती आवळल्यास चिरण्याचा धोका असतो. या मांजात एखादा पक्षी अडकल्यास त्याची सुटका सहजासहजी होत नाही.

बंदी तरी शहरात सर्रास विक्री
चिनी मांजावर सरकारने बंदी घातली आहे. मात्र, अजूनही बाजारपेठेत हा मांजा ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होत आहे. पतंग कापण्यासाठी या मांजाचा स्पर्धकांकडून सर्रास वापर केला जात आहे. केंद्र सरकार, राष्ट्रीय हरित न्यायालयाने नायलॉन, चिनी मांजावर बंदी घातली आहे. तरी शहरात, ग्रामीण भागात पोलिसांसह अन्य यंत्रणांनी आजपर्यंत एकाही मांजा विक्रेत्यावर कारवाई केली नाही. अनेकांना मांजावर बंदी आहे, हेच ठाऊक नसल्याचे दिसते. चिनी मांजा विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

 

Web Title: 14 injured by Chinese nylon Manja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात