शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा रद्द; अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

बारावीच्या मूल्यमापन आणि पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमाच्या पुढील प्रवेशाचे धोरण सरकारने तातडीने जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली. त्यामुळे  कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे समजते. दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक प्रवेश परीक्षा घेण्याचे निश्चित केले.

ठळक मुद्देपालक आणि विद्यार्थ्यांचा सवाल : शासन निर्णयामुळे निर्माण झाली संभ्रमावस्था

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीपाठोपाठ बारावीची परीक्षाही रद्द झाली आहे. त्यामुळे पदवी व अन्य प्रवेशप्रक्रिया कशी होणार, याची पालक, विद्यार्थ्यांना चिंता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबतचे शासनाने सूतोवाच केले होते. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी संभ्रमात होते. कोरोनामुळे केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेदेखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. मात्र, बारावीच्या मूल्यमापन आणि पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमाच्या पुढील प्रवेशाचे धोरण सरकारने तातडीने जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली. त्यामुळे  कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे समजते. दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक प्रवेश परीक्षा घेण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवीसाठीही प्रवेश परीक्षा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी इंजिनिअरिंग औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय शाखांमधील प्रवेश, केंद्रीय तसेच दरवर्षी होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. 

बारावीनंतर संधी...- बारावीनंतर काय करावे? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. प्रत्येकासाठी करिअर खूप महत्त्वाचे आहे. - विद्यार्थी क्षमतेनुसार त्यांचे करिअर निवडतात. विद्यार्थी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड तयारी करतात. तर काही विद्यार्थी स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी परीक्षेची तयारी करतात. बारावीनंतर संधी कोणती? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. - यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाला आणि पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, औषधीशास्त्र, प्रशासकीय सेवा, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, फाईन आर्ट्स, इंटरनेट डिझायनिंग, ग्राफिक डिझाईन, होम सायन्स, एअरपोर्ट मॅनेजमेंटसंबंधित कोर्स, बीफार्म, व्यवसायिक पायलट प्रशिक्षण, मर्चंट नेव्ही प्रशिक्षण आदी अनेक संधी उपलब्ध होतात. 

प्राचार्य म्हणतात...

बारावीची परीक्षा रद्द झाल्याने आता पारंपरिक विद्याशाखांच्या प्रवेशासाठी मेरिटचा निकष लावताना अडचण होणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी असल्याने त्या ठिकाणी हा प्रश्न फारसा उद्भवणार नाही.-डॉ. नितीन माथनकर, प्राचार्य, स्व. कोल्हटकर महाविद्यालय, रोहणा.  

बारावीची परीक्षा होईल की नाही, ही संभ्रमावस्था होती. ती आता शासन निर्णयामुळे स्पष्ट झाली आहे. आता अन्य प्रवेश प्रक्रिया कशा होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे धोरण शासनाने लवकर जाहीर करणे अपेक्षित आहे. -प्रा. डॉ. श्यामप्रकाश पांडे, विभागप्रमुख कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय. 

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा