जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 123 वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 05:00 AM2021-06-18T05:00:00+5:302021-06-18T05:00:18+5:30

कोरोनाकाळामध्ये शाळा बंद असल्याने गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेत गेलेच नाही. त्यामुळे या कालावधीत शाळेतील धोकादायक वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही बांधकामाला गती मिळाली नाही. त्यामुळे वर्गखोली जैसे थेच आहे. ही अशीच अवस्था राहिली तर विद्यार्थ्यांसाठी ते धोक्याचे आहे.

123 classrooms in Zilla Parishad schools are dangerous | जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 123 वर्गखोल्या धोकादायक

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 123 वर्गखोल्या धोकादायक

Next
ठळक मुद्देबांधकामाला मिळाली मंजूरी : १६ कोटी ४४ लाखांचा निधी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या चार वर्षांपासून जवळपास १२३ वर्गखोल्या धोकादायक स्थिती आल्या. यापैकी १२० वर्गखोल्यांचे निर्लेखन करुन नव्याने बांधकाम करण्यास मंजुरी दिली आहे. सन २०१९-२० मध्ये ५९ वर्गखोल्यांसाठी ७. ४८ कोटींचा निधी उपलब्ध झाला. यातील १० वर्ग खोल्यांचे काम पूर्ण झाले आहे. २०२०-२१ करीता ६१ खोल्यांसाठी ८.९६ कोटींचा निधी प्राप्त झाला. परंतु अद्यापही या बांधकामाला सुरुवात झाली नाही. बांधकाम विभागाकडून कामात दिरंगाई होत आहे. 

११४ वर्गखोल्यांना दुरुस्तीची प्रतीक्षा
- २०१९-२० मध्ये ११६ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी ३२ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला मंजुरी दिली असून १ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
n २०२०-२१ मध्ये ११४ खोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यातील ४४ वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीला मंजुरी दिली असून त्यासाठी २ कोटी २३ लाखांचा निधी मिळाला आहे.

अशा शाळेत मुले पाठवायची तरी कशी?

कोरोनाकाळामध्ये शाळा बंद असल्याने गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेत गेलेच नाही. त्यामुळे या कालावधीत शाळेतील धोकादायक वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही बांधकामाला गती मिळाली नाही. त्यामुळे वर्गखोली जैसे थेच आहे. ही अशीच अवस्था राहिली तर विद्यार्थ्यांसाठी ते धोक्याचे आहे.
संजय नागतोडे, पालक

शाळेतील वर्गखोली पाडून बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याने त्या वर्गातील सर्व विद्यार्थी दुसऱ्या वर्गात बसविले जातात. त्यामुळे एकाच वर्गखोलीत दोन वर्गातील विद्यार्थी एकत्र बसविल्याने गोंंधळ उडतो. त्यामुळे अध्यापनावरही त्याचा परिणाम होतो. दीड वर्ष कोरोनात निघून गेले मात्र, आता शाळा सुरु झाल्यास पुन्हा तीच परिस्थिती राहणार आहे.
गिरिश सावरकर, पालक
 

कोणत्या तालुक्यात किती धोकादायक?

जिल्हा परिषदेच्या शाळांतील वर्गखोलीची दुरुस्ती किंवा बांधकामाबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागण्यात आले आहे. यापूर्वीच्या १२३ वर्गखोलींपैकी १२० वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजूरी देण्यात आली आहे. त्याकरिता निधीही उपलब्ध करुन दिला असून काही काम पूर्ण झाले आहे तर काहिंची प्रगतीपथावर आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार आहे.
संजय मेहरे, प्रभारी शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.वर्धा.

 

Web Title: 123 classrooms in Zilla Parishad schools are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.