शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संत्राबागांत फळगळीने उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे यात कोट्यावधीचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : व्यापाऱ्यांकडून दिले जातात पडतीचे भाव

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांमागील संकटाची मालिका अव्याहत सुरू आहे. खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी उशिरा आलेल्या व आता परतीच्या पावसाने पळविले असतानाच, संत्राउत्पादक शेतकरीही परतीच्या पावसामुळे हवालदिल झाले आहेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे.तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे यात कोट्यावधीचे नुकसान होत आहे.पाऊस पडण्याआधी बऱ्यांपैकी असलेले भाव आता शेतकऱ्यांची पडती पाहून ३० हजार रुपये टन एवढ्या नीचांकीवर आले आहेत. फळगळती सुरूच असल्यामुळे वाचलेली फळे तात्काळ विकण्याशिवाय पर्याय शेतकºयांपुढे उरला नाही. अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना शेतकरी करीत असल्याचे मत पाळा येथील शेतकरी नरेंद्र जिचकार यांनी व्यक्त केले आहे.उष्णतेच्या प्रकोपाने आधीच फळगळती झाली होती. वाचलेल्या मालाचे पैसे होेतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. काही शेतकºयांनी फळपिकांचा विमा उतरविला आहे. त्याची नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे. वाळलेल्या संत्रा झाडांच्या भरपाईचीही शेतकºयांना प्रतीक्षाच आहे. खरीपात सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटले असताना संत्र्यावर शेतकरी, मजुराची भिस्त होती. शासनाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी तसेच विमा भरपाईबाबतही व्यापक जनजागृती शासनाने करावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.दरम्यान, विदर्भाच्या कॅलिफोर्नियाच्या पाचवीला पुजलेला संकटांचा फेरा कायम आहे. गत उन्हाळ्यात भूगर्भात पाणीच नसल्याने संत्राबागा मरणपंथाला लागल्या होत्या. आता अतिरिक्त पावसाचा फटका बसला आहे.