संत्राबागांत फळगळीने उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:56+5:30

तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे यात कोट्यावधीचे नुकसान होत आहे.

- | संत्राबागांत फळगळीने उत्पादक हवालदिल

संत्राबागांत फळगळीने उत्पादक हवालदिल

Next
ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : व्यापाऱ्यांकडून दिले जातात पडतीचे भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : शेतकऱ्यांमागील संकटाची मालिका अव्याहत सुरू आहे. खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी उशिरा आलेल्या व आता परतीच्या पावसाने पळविले असतानाच, संत्राउत्पादक शेतकरीही परतीच्या पावसामुळे हवालदिल झाले आहेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे.
तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे यात कोट्यावधीचे नुकसान होत आहे.
पाऊस पडण्याआधी बऱ्यांपैकी असलेले भाव आता शेतकऱ्यांची पडती पाहून ३० हजार रुपये टन एवढ्या नीचांकीवर आले आहेत. फळगळती सुरूच असल्यामुळे वाचलेली फळे तात्काळ विकण्याशिवाय पर्याय शेतकºयांपुढे उरला नाही. अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना शेतकरी करीत असल्याचे मत पाळा येथील शेतकरी नरेंद्र जिचकार यांनी व्यक्त केले आहे.
उष्णतेच्या प्रकोपाने आधीच फळगळती झाली होती. वाचलेल्या मालाचे पैसे होेतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. काही शेतकºयांनी फळपिकांचा विमा उतरविला आहे. त्याची नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे. वाळलेल्या संत्रा झाडांच्या भरपाईचीही शेतकºयांना प्रतीक्षाच आहे. खरीपात सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटले असताना संत्र्यावर शेतकरी, मजुराची भिस्त होती. शासनाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी तसेच विमा भरपाईबाबतही व्यापक जनजागृती शासनाने करावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.
दरम्यान, विदर्भाच्या कॅलिफोर्नियाच्या पाचवीला पुजलेला संकटांचा फेरा कायम आहे. गत उन्हाळ्यात भूगर्भात पाणीच नसल्याने संत्राबागा मरणपंथाला लागल्या होत्या. आता अतिरिक्त पावसाचा फटका बसला आहे.

 

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.