उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारकडून रब्बी बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरणावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:21 IST2025-09-05T16:11:37+5:302025-09-05T16:21:34+5:30

योगी सरकार रब्बी पिकांच्या बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरण यावर लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी बुधवारी कृषी संचालनालयात बैठक घेतली.

Yogi government in Uttar Pradesh focuses on timely availability and distribution of Rabi seeds | उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारकडून रब्बी बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरणावर भर

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारकडून रब्बी बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरणावर भर

लखनऊ : योगी सरकार रब्बी पिकांच्या बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरण यावर लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी बुधवारी कृषी संचालनालयात बैठक घेतली. त्यांनी कृषी विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजना व कार्यक्रमांचा आढावा घेतला.

कृषीमंत्र्यांनी सांगितले की, शेती आणि शेतकरी हे योगी प्रशासनाचे प्राधान्य आहेत. सुधारित बियाण्यांचे वितरण शेतकऱ्यांपर्यंत वेळेत व पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पोहोचले पाहिजे.

कृषीमंत्र्यांनी सर्व जिल्हा व विभागीय अधिकाऱ्यांसाठी केलेल्या सूचना

  1. सर्व रब्बी पिकांची (गहू, ज्वारी, हरभरा, वाटाणा, मसूर, मोहरी, अळशी/जवस इ.) बियाणे २५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना वितरणासाठी सर्व शासकीय बियाणे दुकानांमध्ये उपलब्ध करून द्यावीत.
  2. सर्व अनुदानित रब्बी बियाण्यांचे वितरण शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी २५ नोव्हेंबरपर्यंत शासकीय कृषी बियाणे विक्री केंद्रांमार्फत पूर्ण झाले पाहिजे.
  3. पूरग्रस्त किंवा नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ वेळेत मिळावा. महसूल, कृषी व विमा विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने हे काम तातडीने पूर्ण करून लाभग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचवावा.
  4. रब्बी पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी विशेषतः डाळी (हरभरा, वाटाणा, मसूर इ.) व तेलबिया (मोहरी, राई, अळशी/जवस इ.) पिकांवर जिल्हा स्तरावरील उपसंचालक कृषी/जिल्हा कृषी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत.

या बैठकीला राज्यमंत्री (कृषी) बलदेव सिंह औलख, कृषीचे अपर मुख्य सचिव रवींद्र जी, सचिव इंद्र विक्रम सिंह, विशेष सचिव टी.के. शिबू, ओ.पी. वर्मा, संचालक पंकज त्रिपाठी, सांख्यिकी संचालक सुमिता सिंह आणि इतर उपस्थित होते.

अधिक वाचा: जीएसटी कपातीचा मस्त्यपालन व्यवसायासाठी एकंदरीत कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

Web Title: Yogi government in Uttar Pradesh focuses on timely availability and distribution of Rabi seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.