चॉकलेट समजून तीन वर्षीय चिमुकल्याने चक्क जिवंत साप तोंडात घातला, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 09:22 PM2023-06-05T21:22:16+5:302023-06-05T21:22:57+5:30

उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

uttar-pradesh-three-year-old-child-chewed-a-snake-thinking-it-was-chocolate | चॉकलेट समजून तीन वर्षीय चिमुकल्याने चक्क जिवंत साप तोंडात घातला, नंतर...

चॉकलेट समजून तीन वर्षीय चिमुकल्याने चक्क जिवंत साप तोंडात घातला, नंतर...

googlenewsNext


उत्तर प्रदेशातील फारुखाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेळता-खेळता तीन वर्षीय चिमुकल्याने चॉकलेट समजून चक्क जिवंत सापाला तोंडात घातल्याची घटना घडली. माहिती मिळताच घरत्यांनी चिमुकल्याला घाई-घाईत रुग्णालयात नेले. मृत सापही सोबत ठेवला. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांनाही धक्का बसला. सध्या बाळाची प्रकृती ठीक आहे.

हे प्रकरण मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदनापूर गावातील आहे. येथे राहणाऱ्या दिनेश कुमार यांचा तीन वर्षीय अक्षय घराच्या अंगणात खेळत होता, यावेळी एक छोटा साप त्याच्यासमोर आला. चॉकलेट समजून त्या चिमुकल्याने साप तोंडात घातले आणि दाताने चावून काढले. यावेळी त्याच्या आजीने हा प्रकार पाहिला. 

मुलाच्या हातात साप पाहून आजी ओरडली आणि तात्काळ साप दूर फेकून दिला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉक्टरांनी मुलाला राम मनोहर लोहिया रुग्णालयात पाठवले. कुटुंबीयांना त्या मृत सापालाही रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलावर प्राथमिक उपचार करुन घरी पाठवले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे.

Web Title: uttar-pradesh-three-year-old-child-chewed-a-snake-thinking-it-was-chocolate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.