शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

Shocking: मामीच्या प्रेमात वेडा झाला भाचा; लग्नात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा काढला काटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 19:54 IST

Uttar Pradesh Sambhal Crime: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली. आपल्या मामीशी लग्न करण्याच्या हट्टापायी एका व्यक्तीने आपल्या चार मुलांच्या डोळ्यांदेखत पत्नीची हत्या केली.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली. आपल्या मामीशी लग्न करण्याच्या हट्टापायी एका व्यक्तीने आपल्या चार मुलांच्या डोळ्यांदेखत पत्नीची हत्या केली. या खळबळजनक घटनेनंतर आरोपीने कात्रीने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

हा थरारक गुन्हा संभल कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडी किशनदास सराय या गावात घडला. मृत महिलेची ओळख नजमा (वय, ३८) अशी पटली असून, ती आशा वर्कर म्हणून काम करायची. तर, आरोपी पती मोहम्मद नफीस (वय, ४०) हा मेडिकल स्टोअरचा मालक असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, नफीसचे गेल्या सुमारे तीन वर्षांपासून आपल्या मामाच्या बायकोसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. वैतागून नजमा आपल्या चार मुलांसह पतीचे घर सोडले आणि मंडी किशनदास सराय परिसरातीलच एका गावात भाड्याच्या घरात राहू लागली. सहा महिन्यांनंतर, तिला आशा वर्करची नोकरी मिळाली आणि तिने स्वतंत्रपणे आपल्या मुलांचा सांभाळ करण्यास सुरुवात केली.

मामीशी लग्नाचा हट्ट आणि वारंवार वाद

गेल्या अनेक महिन्यांपासून नफीस नजमावर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता, जेणेकरून त्याला आपल्या मामीशी लग्न करता येईल. मात्र, नजमा यासाठी तयार नव्हती. रविवारी रात्री, आपले मेडिकल स्टोअर बंद करून नफीस आपल्या पत्नीशी बोलण्यासाठी तिच्या घरी गेला. रात्री साधारण १०:३० च्या सुमारास, घटस्फोटाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर हा वाद इतका पेटला की, नफीसने रागाच्या भरात घरात पडलेली कात्री उचलली आणि नजमावर सपावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नजमाचा जागीच मृत्यू झाला. हा भयानक प्रसंग त्या चारही मुलांच्या डोळ्यांदेखत घडला.

पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न

या घटनेनंतर, नफीसनेही स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. नफीसने कात्रीने स्वतःवर वार केले. मात्र, आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि त्याला पकडून पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी नफीसला ताब्यात घेतले असून जखमी अवस्थेत त्याला वैद्यकीय उपचारासाठी मोरादाबाद येथे हलवण्यात आले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणाबाबत बोलताना निरीक्षक गजेंद्र सिंग यांनी सांगितले की, हत्येचा आरोप असलेल्या पतीला ताब्यात घेण्यात आले असून त्याला वैद्यकीय उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. रक्ताने माखलेली कात्री जप्त करण्यात आली असून बोटांच्या ठशांच्या विश्लेषणासाठी ती फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man kills wife for affair with aunt; attempts suicide.

Web Summary : In Sambhal, a man murdered his wife, a mother of four, for wanting to marry his aunt. He attacked her with scissors and then tried to kill himself. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश