शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:37 IST

Uttar Pradesh Crime: हुंड्यात स्कॉर्पिओ न मिळाल्याने नवविवाहित महिलेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका नवविवाहित महिलेने तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार, पतीने हुंड्यात स्कॉर्पिओ न मिळाल्याने तिचा शारिरीक छळ केला. तसेच 'तुझे दात चांगले नाहीत' असे म्हणून तिला घरातून निघून जाण्यास सांगितले, अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिच्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली नगर परिसरात राहणाऱ्या पीडितेचे लग्न जुलै २०२४ मध्ये झाले. पीडितेच्या वडिलांनी ऐपतीनुसार हुंडा दिला. मात्र, लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनंतर एका कंपनीत मॅनेजर असलेल्या तिच्या पतीने हुंड्यात स्कॉर्पिओ मागितली. हुंडा न मिळाल्याने पती आणि सासरच्या इतर लोकांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. तिला दोन दिवस उपाशी ठेवण्यात आले आणि सतत तिचा अपमान करण्यात आला. तसेच तुझे दात चांगले नाहीत, येथून निघून जा, नाहीतर मी तुला मारून टाकीन, अशीही पतीने तिला धमकी दिली.

स्कॉर्पिओ द्या किंवा मुलीला घेऊन जा

सासरच्या मंडळींनी पीडितेच्या आई-वडिलांना स्पष्टपणे सांगितले की, एकतर स्कॉर्पिओ आणा किंवा मुलीला कायमचे परत घेऊन जा. हे ऐकून पीडितेचे वडील आजारी पडले  आणि सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्युनंतर जेव्हा महिला तिच्या सासरच्या घरी परतली, तेव्हा सासरच्या लोकांनी तिला घरात प्रवेश दिला नाही. त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली.

पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पीडितेच्या तक्रारीवरून, महिला पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला ठाणे प्रभारी मोनी निषाद यांनी सांगितले की, महिलेची तक्रार मिळाल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींविरोधात  हुंडा छळ, धमकी आणि इतर गंभीर आरोपांच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासाच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dowry Demand: Bride Tortured for Scorpio Car, Case Filed

Web Summary : A newlywed in Uttar Pradesh faced abuse for failing to provide a Scorpio as dowry. Her husband and in-laws allegedly subjected her to physical and mental torture, demanding the car and ultimately leading to a police complaint and charges against four individuals.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश