शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:02 IST

"आपल्या पुढी आव्हान असे आहे की, काही लोक समाजातील लोकांना मुख्यप्रवाहापासून वेगळे करण्याचे काम करत आहेत. काही लोक सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जातीय संघर्षाची स्थिती निर्माण करतात."

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. जौनपूर येथे मोहरम दरम्यान ऊंच 'ताजियां'मुळे झालेल्या  दुर्घटनेनंतर, लोकांच्या विरोधाचा उल्लेख करत, मुख्यमंत्री योगी म्हणाले, "मी पोलिसांना म्हणालो, यांना लाठ्या मारून बाहेर काढा. कारण, 'ये लातों के भूत हैं, बातों से नहीं मानेंगे'". एवढेच नाही तर, "मोहरमच्या प्रत्येक मिरवणुकीमुळे, दंगली, जाळपोळ आणि तोडफोड होत असे. दुसऱ्या बाजूला कावड यात्रा सुरू आहे, जो एकतेचा अद्भुत संगम आहे," असेही योगी म्हणाले. ते शुक्रवारी वाराणसी येथे बोलत होते. 

मुख्यमंत्री योगी म्हणाले, "श्रावण महिना सुरू आहे. त्यापूर्वी मोहरम होता. आम्ही नियम तयार केला होता की, ताजीयाची उंची मर्यादित ठेवण्यात यावी. कारण यामुळे वीजेच्या तारा आणि झाडांच्या फांद्यांचे नुकसान होते. जौनपूरमध्ये एक घटना घडली, ताजिया एवढा उंच होता की, तो हायटेन्शन लाईनच्या संपर्कात आला आणि या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला. यानंतर, गोंधळ निर्माण झाला आणि रस्ता जाम करण्यात आला. पोलिसांनी मला विचारले, यावर मी म्हणालो, काठ्या चालवा. 'ये लातों के भूत हैं. बातों से नही मानेंगे.' सोशल मीडियावर कोणीही याचा विरोध केला नाही."

योगी पुढे म्हणाले, "आपल्या पुढी आव्हान असे आहे की, काही लोक समाजातील लोकांना मुख्यप्रवाहापासून वेगळे करण्याचे काम करत आहेत. काही लोक सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जातीय संघर्षाची स्थिती निर्माण करतात."

"2,3 वर्षांपूर्वी, अशीच एक घटना घडली होती, एका जाळपोळीच्या घटनेत एका व्यक्तीने भगवे अंगावर घेतलेले होते. पण मध्येच त्याच्या तोंडून 'या अल्लाह' असे निघाले. असे लोक ओळखणे आवश्यक आहे," असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथmuharramमुहर्रम