शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या घरी बनवायचं का गारेगारआइसस्क्रिम, ही घ्या एकदम सोप्पी रेसिपी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 08:00 IST

आज आईस्क्रीम करूया! फार काही कठीण नाही, सोप्पं असतं ते!

ठळक मुद्देवापरलेली सगळी भांडी आपली आपण घासून टाका नाही तर आई पुन्हा स्वयंपाकघरात येऊ देणार नाही हे लक्षात ठेवा!

लहानपणी कुल्फी करण्याचे उद्योग कोणी कोणी केलेत? खरं सांगा! पहिली दुसरीत असतांना पाण्याच्या ग्लास मध्ये सरबत घालायचं, त्याच्यात चमचा घालायचा आणि ते फ्रीजर मध्ये ठेऊन द्यायचं. मग दर अध्र्या तासाने फ्रीजर उघडून आईची बोलणी खायची. - आणि शेवटी एकदाचं ग्लास मधलं सगळं सरबत गोठलं, की तो ग्लासच्या शेपचा, सरबताचा चवीचा चमच्यावर अडकलेला बर्फाचा गोळा बाहेर काढायचा आणि    ‘मी आईस्क्रीम केलं’ असं म्हणून फुशारक्या मारत घाईघाईने खायचा. कारण ते खतरनाक आईस्क्रीम एकदम पटापट वितळतं. हा उद्योग ज्यांच्या घरात फ्रीज आहे त्या प्रत्येकाने केलेला असतो. ज्यांच्या घरात फ्रीज नाही त्यांनी फ्रीज असलेल्या नातेवाईकांकडे किंवा मित्र मैत्रिणींच्या घरी हा प्रयोग केलेला असतो. लहान असतांना तुम्ही इतके उद्योग करू शकत होता, तर आता खरं आईस्क्रीम पण करू शकता. सोप्प असतं ते.

दोन कप दूध घ्यायचं. त्यात चवीनुसार साखर घालायची. मग चिक्कू, स्ट्रॉबेरी, आंबा यातलं एखादं फळ मिळालं तर ते मिक्सरला फिरवून त्यात घालायचं. ते नाही मिळालं तर कोको पावडर, तीही नसेल तर कॉफी पावडर आणि अगदीच काही नाही तर थोडा सुका मेवा बारीक करून घालायचा. नुसता सुका मेवा घातला तर त्याला व्हॅनिला किंवा केशर फ्लेवर साठी घालायचं. मग हे सगळं प्रकरण ढवळत ढवळत गॅसवर गरम करायचं. घरात मक्याचं पीठ असेल तर ते घाला म्हणजे आईस्क्रीम छान घट्ट होतं. कॉर्न फ्लोअर नसेल तर दूध थोडं आटवून घ्या. ते गार होऊ द्या. आणि मग फ्रीजर मध्ये ठेवा. साधारण चार-पाच तासांनी ते सेट होत आलं, की बाहेर काढायचं आणि मिक्सरला फिरवून परत आत ठेवायचं. त्यानंतर चार तासांनी आईस्क्रीम तय्यार!फक्त यात वापरलेली सगळी भांडी आपली आपण घासून टाका नाही तर आई पुन्हा स्वयंपाकघरात येऊ देणार नाही हे लक्षात ठेवा!