शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणू जाणार नाही? मग आता सगळ्यांनी घरीच बसायचं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:20 IST

घरीच बसून राहाणं कसं शक्य आहे?

ठळक मुद्दे आपलं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवातही करु शकू. 

कोरोना कधीच जाणार नाहीये म्हणतात मग आपण कायम असंच घरात बसून राहायचं का? हे कसं शक्य आहे? - आर्या नवले, वर्धा

कोरोना विषाणू कधीच जाणार नाही हे अगदी खरं आहे. कोरोना विषाणूचे आजवर 1क्क् प्रकार माणसाला माहित झालेले आहेत. त्यातल्या आठएक  प्रकारांचा संसर्ग माणसाला होतो. पण कोविड 19 हा त्यातला सगळ्यात जास्त बाधा करणारा विषाणू आहे. यावर औषध नाही की लस नाही. लस शोधण्याचे प्रयन्त सुरु आहेत पण ती केव्हा मिळेल , हे आजतरी आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे कोरोना कधीच जाणार नाही हे एकाअर्थी बरोबर आहे. पण याचा अर्थ आपण कधीच घराबाहेर पडायचं नाही असा मुळीच नाही. आताची परिस्थिती बिकट आहे म्हणून आपला लॉक डाऊन सतत वाढवला जातोय. पण या विषाणूचा संसर्ग जरा आटोक्यात आला की आपल्याला बाहेर जायला आणि नियमित आपापलं काम करायला नक्की परवानगी मिळेल. तशी महाराष्ट्रात जे जे भाग ग्रीन झोन म्हणून घोषित झाले आहेत तिथे बंदी शिथिलही केलेली आहे. मुळात आर्या, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे कालपयर्ंत आपण जसं जगत होतो तसं यापुढे आपल्याला जगता येणार नाही. आपल्याला आपल्या सवयी आता बदलाव्या लागतील. आता लॉक डाउनच्या काळात आपण जे सोशल डिस्टंसिंग पळतोय ते आपल्याला कदाचित पुढे अजून काही महिने पाळावं लागेल. तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडण्याची सवय बदलून चालणार नाही. निदान पुढची एक दोन वर्ष तरी. आपण बाहेरून आणलेला भाजीपाला, बंद पाकिटातल्या वस्तू ज्याप्रमाणो घरात ठेवण्याआधी आता धुवून घेतोय तसंच आपल्याला कायम करावं लागेल. कचरा न करणं, रस्त्यात कुठेही न थुंकणं, शौचाला उघड्यावर न जाणं, सार्वजनिक स्वच्छता गृह वापरल्यावर भरपूर पाणी टाकून स्वच्छ ठेवणं या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी सवयीचा भाग व्हायला हव्यात. बाहेर जाताना, बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणं हे कायमचं लक्षात ठेवावं लागेल. 

आणि सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला   सगळ्या सरकारी यंत्रणांनाही  त्यांची कामे चोखच करावी लागतील, आणि आपल्याला सगळ्यांना त्यांना मदतही करावी लागेल. म्हणजे मग आपण बाहेरही पडू शकू आणि आपलं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवातही करु शकू.