कमी खर्चात समुद्र, शांतता आणि निसर्गाचा आनंद, पुद्दुचेरीला जाऊन विसराल सगळे डेस्टिनेशन; पाहा किती येऊ शकतो खर्च....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 14:00 IST2026-05-09T13:44:06+5:302026-05-09T14:00:10+5:30
Pondicherry Travel Tips : येथे तुम्हाला शांतता, निवांतपणा आणि सुंदर निसर्गाचा अनुभव मिळतो. विशेष म्हणजे, कमी बजेटमध्येही येथे छान ट्रिप प्लॅन करता येते. साधारण ८ ते १५ हजार रुपयांत तुम्ही पुद्दुचेरीची सुंदर सहल करू शकता.

कमी खर्चात समुद्र, शांतता आणि निसर्गाचा आनंद, पुद्दुचेरीला जाऊन विसराल सगळे डेस्टिनेशन; पाहा किती येऊ शकतो खर्च....
Pondicherry Travel Tips : आपण जर शहरातील गोंधळ आणि धावपळीपासून दूर शांततेसाठी ट्रिप प्लॅन करत असाल तर पुद्दुचेरी मधील स्वच्छ निळाशार समुद्र, शांत वातावरण आणि रंगीबेरंगी रस्ते तुमचा ताण कमी करण्यास मदत करू शकतात. मुंबई, पुणेसारख्या धावपळीच्या जीवनशैलीला कंटाळला असाल, तर पुद्दुचेरी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. येथे तुम्हाला शांतता, निवांतपणा आणि सुंदर निसर्गाचा अनुभव मिळतो. विशेष म्हणजे, कमी बजेटमध्येही येथे छान ट्रिप प्लॅन करता येते. साधारण ८ ते १५ हजार रुपयांत तुम्ही पुद्दुचेरीची सुंदर सहल करू शकता.
युरोपसारखा अनुभव
पुद्दुचेरीला गेल्यावर अनेकांना आपण एखाद्या युरोपियन देशात आलो आहोत अशी जाणीव होते. कारण येथे आजही फ्रेंच संस्कृतीची झलक पाहायला मिळते. समुद्र किनाऱ्याजवळ असलेली छोटी कॅफे, सुंदर इमारती आणि शांत रस्ते या शहराला वेगळं आकर्षण देतात. गेल्या काही वर्षांत पुद्दुचेरी हे ट्रॅव्हल लव्हर्ससाठी लोकप्रिय डेस्टिनेशन बनलं आहे.
पुद्दुचेरीच्या बीचची खासियत
पुद्दुचेरीच्या बीचची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथील शांतता. गोव्यातील बीचवर अनेकदा मोठी गर्दी असते, पण पुद्दुचेरीतील वातावरण शांत आणि निवांत आहे. येथील रॉक बीच, ज्याला प्रोमेनेड बीच असंही म्हणतात, संध्याकाळी वाहनांसाठी बंद केला जातो. त्यामुळे लोक समुद्रकिनारी कोणत्याही गोंधळाशिवाय आरामात फेरफटका मारू शकतात.
अॅडव्हेंचर आणि शांतता एकत्र
पुद्दुचेरीमध्ये तुम्ही केवळ समुद्राच्या लाटांचा आनंदच घेऊ शकत नाही, तर अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीजचाही अनुभव घेऊ शकता. येथे सर्फिंग खूप लोकप्रिय आहे. नव्यानेच सर्फिंग शिकवण्याची सुविधाही उपलब्ध असते.
मुंबई-पुण्याहून किती खर्च येईल?
पुडुचेरी ला महाराष्ट्रातून, खासकरून मुंबई किंवा पुणे येथून ३ ते ४ दिवसांची ट्रिप प्लॅन करत असाल, तर खर्च तुमच्या प्रवासाच्या पद्धतीवर अवलंबून असतो. साधारण अंदाज असा असू शकतो:
बजेट ट्रिप (प्रति व्यक्ती)
रेल्वे प्रवास - २,००० ते ४,००० रूपये (रिटर्न)
हॉस्टेल / बजेट होमस्टे - ८०० ते १,५०० रूपये प्रति रात्र
जेवण - ३०० ते ७०० रूपये प्रति दिवस
गावात फिरणे आणि बीच अॅक्टिव्हिटीज - १,००० ते २,००० रूपये
एकूण खर्च - साधारण ८,००० ते १२,०००
मिड-रेंज ट्रिप
फ्लाइट + बस/कॅब - ८,००० ते १५,००० रूपये
चांगले हॉटेल - २,५०० ते ५,००० रूपये प्रति रात्र
कॅफे, स्कूटर रेंट, सर्फिंग इत्यादी
एकूण खर्च - १८,००० ते ३०,००० रूपये
पुद्दुचेरीला जाण्याचा सर्वोत्तम काळ
ऑक्टोबर ते मार्च हा पुद्दुचेरी फिरण्यासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि समुद्र किनाऱ्याचा आनंद अधिक छानपणे घेता येतो.