रेल्वेच्या स्लीपर किंवा एसी कोचमध्ये सोबत किती सामान नेऊ शकता? लिमिट नसेल माहीत तर भरावा लागेल दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:48 IST2026-04-30T15:44:34+5:302026-04-30T15:48:55+5:30
Railway Luggage Limit : रेल्वेत आपण लिमिटपेक्षा जास्त लगेच सोबत नेलं तर आपल्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे लगेजबाबत रेल्वेचे काय नियम आहेत, हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे.

रेल्वेच्या स्लीपर किंवा एसी कोचमध्ये सोबत किती सामान नेऊ शकता? लिमिट नसेल माहीत तर भरावा लागेल दंड
Railway Luggage Limit : आपण जर विमानातून प्रवास केला असेल तर माहीत असेल की, लगेज म्हणजेच सामान किती नेऊ शकता याला एक लिमिट असते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हा लिमिटचा नियम केवळ विमानातच, नाही तर रेल्वेमध्ये सुद्धा असतो. म्हणजे जर रेल्वेत आपण लिमिटपेक्षा जास्त लगेच सोबत नेलं तर आपल्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे लगेजबाबत रेल्वेचे काय नियम आहेत, हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे.
रेल्वेने लगेजबाबचे नियम प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा ध्यानात घेऊन बनवले आहेत. महत्वाची बाब म्हणजे आपण कोणत्या क्लासचं तिकीट काढलंय त्यानुसार आपल्या लगेजची लिमिट ठरत असते. आपण किती लगेज फ्रीमध्ये नेऊ शकता आणि किती लगेज असल्यावर दंड भरावा लागू शकतो हे पाहुयात.
कोणत्या कोचमध्ये किती सामान नेऊ शकता?
भारतीय रेल्वेमध्ये वेगवेगळ्या क्लाससाठी लगेजची लिमिट वेगवेगळी ठरवण्यात आलीये.
- AC फर्स्ट क्लास (1A)- या क्लासमध्ये प्रवासी ७० किलोपर्यंत सामान फ्री घेऊन जाऊ शकता.
- AC टू-टियर (2A)- या क्लासमध्ये फ्री लगेज घेऊन जाण्याची लिमिट ५० किलोपर्यंत आहे.
- AC थ्री-टियर (3A) आणि स्लीपर क्लास (SL)- या दोन्ही क्लासमध्ये सामान्य घेऊन जाण्याची लिमिट ४० किलो इतकी आहे.
- सेकंड सीटिंग (2S)- जनरल किंवा सेकंड सीटिंग क्लासमध्ये ही लिमिट सगळ्यात कमी म्हणजे केवळ ३५ किलो इतकी आहे.
Are you carrying more than allowed? 🤔
— South Central Railway (@SCRailwayIndia) April 26, 2026
Check your luggage weight limits before boarding and avoid extra charges. 🚆
Make your journey easy and comfortable!#PassengerAwareness#IndianRailways#TravelTips@RailMinIndia@AshwiniVaishnawpic.twitter.com/8sDPa8EClh
हेही महत्वाचं
फ्री लिमिट - हे ते वजन असतं, जे आपण कोणतेही एक्स्ट्रा पैसे न देता कोचमध्ये आपल्यासोबत नेऊ शकता.
मार्जिनल अलाउंस - आपण सोबत फ्री लिमिटपेक्षाही थोडं आणखी सामान नेऊ शकता, पण एक्स्ट्रा वजनासाठी आपल्याला एक ठराविक रक्कम द्यावी लागते.
मॅक्सिमम लिमिट - ही ती लिमिट आहे, ज्यापेक्षा जास्त सामान आपण पैसे देऊनही कोचमध्ये नेऊ शकत नाही. जास्त सामान असेल तर ते पार्सल व्हॅनमध्ये बुक करणं गरजेचं असतं.