शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कॅम्पिंगसाठी बेस्ट जागा शोधताय का? लेह-लडाखमधील ७ जागांवर घ्या रोमांचक अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 4:55 PM

फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये राहून राहून कंटाळा आला असेल आणि वेगळ्या रोमांचक अनुभवासाठी तुम्ही तयार असाल तर...

फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये राहून राहून कंटाळा आला असेल आणि वेगळ्या रोमांचक अनुभवासाठी तुम्ही तयार असाल तर कॅम्पिंगसाठी लोकप्रिय असलेल्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. उंचच डोंगर-दऱ्या आणि तलावांची ओळख आहे लेह-लडाख. येथील सुंदर डोंगर नेहमी पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहेत. या उन्हाळ्यात जर लदाखला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला कॅम्पिंगची काही खास ठिकाणे सांगणार आहोत. 

१) नुब्रा व्हॅली -

(Image Credit : Wikipedia)

हा आश्चर्यकारक घाट Tri-Arm Valley नावानेही ओळखला जातो. जर लदाखला जाणार असाल तर हे ठिकाण कॅम्पिंगसाठी परफेक्ट आहे. येथील बर्फाची चादर पांघरलेले डोंगर, जुने वाडे बघाण्यात एक वेगळीच मजा आहे. इथे कॅम्पिंग करण्याचा सर्वात चांगला कालावधी जून ते सप्टेंबर दरम्यानचा मानला जातो. कारण यावेळी येथील वातावरण फारच चांगलं असतं. 

२) सिंधु नदी -

(Image Credit : TripAdvisor)

लेह-लदाखच्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. नैसर्गिक सुंदरता आणि आश्चर्यकारक दृश्यांसोबत इथे कॅंम्पिग करण्याची वेगळीच मजा आहे. हा परिसर सिंधु संस्कृतीचं घर आहे. ही संस्कृती मानव जातीची सर्वात जुनी संस्कृती मानली जाते. तुम्ही इथे दिवसा ट्रेक करू शकता आणि अधिक शानदार अनुभवासाठी इको-फ्रेन्डली Tsermang Eco Camp आणि Indus River Camp मध्ये रात्र घालवू शकता. 

३) पॅंगोंग लेक -

(Image Credit : Booking.com)

शांत आणि सुंदर वातावरणात पॅंगोंग तलावाजवळ कॅम्पिग करू शकता. त्यासोबतच नैसर्गिक सुंदरतेचा आनंद घेऊ शकता. इथे चारही बाजूने असलेल्या हिरवळीच्या तुम्ही प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. 

४) Tso Kar Lake -

(Image Credit : TripAdvisor)

Tso Kar Lake इतकी स्वच्छ आहे की, जणू काचेची चादर भासावी. या इतक्या सुंदर नदीच्या काठावर तुम्ही कॅम्पिगचा अनोखा अनुभव घेऊ शकता. 

५) मार्खा व्हॅली -

(Image Credit : travelbirbilling.com)

मार्खा व्हॅलीला Tea House Trek असंही म्हटलं जातं. हे लदाख आणि जांस्कर रेंज यांच्या मधील एक अद्भूत ठिकाण आहे. इथे तुम्ही दिवसा हेमिस नॅशनल पार्क, Gandala La आणि Kongmaru La इथे फिरू शकता. तर रात्री पॅराशूट टेंटमध्ये रात्र घालवू शकता. 

६) Tsomoriri Lake -

(Image Credit : team4adventure.com)

ही लदाखमधील सर्वात मोठी लेक आहे. याची उंची १५ हजार ०७५ फूट इतकी आहे. तसेच इथे अनेक पार्क आहेत. जिथे ३० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी बघायला मिळतात. तसेच इथे जवळच एक छोटं गाव असून तिथे तुम्ही स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही इथे नार्लिंग कॅम्प आणि Nomadic Camp साठी बुकिंग करू शकता. 

७) झंस्कार व्हॅली -

(Image Credit : TravelTriangle)

ही फार लोकप्रिय व्हॅली आहे. इथे तुम्ही दिवसा फिरू शकता. तसेच जर तुम्हाला खुल्या आकाशाखाली रात्र घालवायची असेल तर त्यासाठीही हे ठिकाण बेस्ट आहे. याजवळच ट्रेकिंग ट्रेल आहे. इथे कॅम्पिंगसाठी जून ते सप्टेंबर हा कालावधी बेस्ट मानला जातो. 

टॅग्स :ladakhलडाखTravel Tipsट्रॅव्हल टिप्स