वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
काँग्रेस विरोधात वंचितने ज्या तीन जागांवर आपला उमेदवार उभा केला आहे, त्यापैकी एका जागेवर काँग्रेसला आणि एका जागेवर वंचितला दुहीचा फटका बसण्याची शक्यता आहे. ...
PMC Election 2026 भाजपचे २ उमेदवार बिनविरोध आले तेथे वंचितकडे उमेदवार होता. परंतु काँग्रेस आणि उद्धवसेना यांनी या ठिकाणी उमेदवार न देता भाजपला मदत केली ...
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत. प्रचारसभा सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत, काल वंचित बहुजन आघाडीची सोलापूरात सभा झाली. ...
Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत गोंधळ होता. आता तो दूर झाला आहे. ...