Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्याFOLLOW
Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News
शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. Read More
पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाच्या सांगलीपर्यतच्या आखणीस आणि भूसंपादनासाठी राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार जवळपास १५० पेक्षा जास्त गावांतील जमीनमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. ...
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग आहे. काही लोकांनी त्याला विरोध केला असला तरी आम्ही या मार्गाचा नवा प्लॅन तयार केला असून, तो कमीत कमी बागायती शेतीमधून जाणारा असेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी के ...
शक्तिपीठाला विरोध करणारे हे बाधित शेतकरी नव्हे तर राजकीय बाधित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाखाली न येता जुन्या आराखड्यानुसारच शक्तिपीठ महामार्ग करावा. ...