सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला. Read More
राहुल यांचा राजीनामा झाल्यावर काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्वाची जी चर्चा सुरु झाली त्यामुळे राहुल यांच्या अवतीभवती असलेल्या काही तरुण नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले. ...
पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता. ...
राजस्थानमधील भाजपचे खा. व केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पायलट यांना लोकनेते म्हटले आहे. त्यांच्यासारखा जनाधार असलेला नेता आमच्या पक्षात येत असेल तर स्वागतच आहे, असेही ते म्हणाले. ...
Rajasthan Political Crisis: सचिन पायलट थोड्याच वेळात बाजू मांडणार असून संध्याकाळी 5 वाजता ते यावर बोलण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दिशाही सांगण्याची शक्यता आहे. ...