शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये एका महिन्यात केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शहरातील राजकीय पक्षांसह विकासकामांची नामफलके कापडी आवरणाने झाकून ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शहरातील चौक आणि रस्त्यांवरील राजकीय पक्षांचे झेंडे, होर्र्डींग्ज उतरविण्यात आले आहेत. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा सणानिमित्त शिर्डी गुलाब, दांडी गुलाब (छोटा गुलाब) आणि झेंडूची आवक दसरा सणाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून सध्यातरी पक्ष पंधरवडा असल्याने फुलांनाही म्हणावा तसा भाव मिळत नाही. ...
महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीसाठी १५ लाख रुपये खर्च करून गुंजेगाव जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या विज्ञान केंंद्राचा गुंजेगाव व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ग्रामीण भा ...
जिल्ह्यात २० सप्टेंबर रोजी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. खरीप हंगामातील पिकांना जीवदानासह ओढे- नदी, नाले खळखळून वाहिले. २१ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २१.९९ मि.मी. पाऊस झाला. ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण १३ लाख ९९ हजार ३६१ मतदार असून, १ हजार ५०६ मतदान केंद्र आहेत़ निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांची ७४ पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागले असून, पुन्हा विधानसभा गाठण्याच्या इराद्याने विद्यमान आमदारांनी जोरदार तयारी चालविली आहे़ दुसरीकडे नवीन उमेदवारही राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सरसावले आहेत़ ...