Parbhani: Shirdi Rose will be expensive on Dussehra Muharta | परभणी : दसरा मुहुर्तावर शिर्डी गुलाब महागणार

परभणी : दसरा मुहुर्तावर शिर्डी गुलाब महागणार

यशवंत परांडकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा सणानिमित्त शिर्डी गुलाब, दांडी गुलाब (छोटा गुलाब) आणि झेंडूची आवक दसरा सणाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून सध्यातरी पक्ष पंधरवडा असल्याने फुलांनाही म्हणावा तसा भाव मिळत नाही.
परभणी शहरात व जिल्ह्यामध्ये हैदराबाद, पुणे, नांदेड या मोठ्या शहरांतून छोटा गुलाब, झेंडू, शेवंती, जरबेरा, मोठा गुलाब, काकडी इ. विविध प्रकारची फुले विक्रीस येत आहेत.
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त नसल्यामुळे फुलांची आवकही घटली होती. शिर्डी गुलाब २५ ते ३० रुपये किलोप्रमाणे विक्री होतो. दसरा हा मोठा सण तोंडावर असून झेंडूच्या फुलांनाही मागणी वाढली आहे. झेंडूची फुले २५ ते ३० रुपये किलोप्रमाणे सध्या विकली जात आहेत. दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुले भाव खावून जातील, असेही विक्रेता करीम फुलारी म्हणाले. शेवंतीच्या फुलाला म्हणावी तेवढी मागणी नसली तरीही शेवंतीची फुले ३५ रुपये किलो प्रमाणे विकली जात आहेत. निशिगंधा फुलांनीही चांगला भाव खाल्ला आहे. सणासुदीच्या तोंडावर निशिगंधा फुलांचा भाव ८० ते १०० किलोप्रमाणे असून घासाघीस केल्यास विक्रेते फुलांचा भाव कमी आहेत. दरम्यान, दसरा सण अवघ्या १६ दिवसांवर येऊन ठेपला असून ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे विकला जाणारा शिर्डी गुलाब हा दसºयाच्या मुहूर्तावर ५० त ५५ किलो भावाने विकला जाऊ शकतो. दसºयाच्या दिवशी शिर्डी गुलाबाच्या भावाची स्थिती काय असेल हे त्याच दिवशी कळेल, असे फूल विक्रेते करीम फुलारी यांनी सांगितले.

Web Title: Parbhani: Shirdi Rose will be expensive on Dussehra Muharta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.