नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
व्यावसायिक अंतराळ यान व कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह नऊ जणांची निवड केली आहे. ...
मागील दोन दिवसांपासून खगोलप्रेमींमध्ये या खगोलीय अविष्काराचे कुतुहल पहावयास मिळत असून बुधवारीही बहुतांश खगोलप्रेमींनी घरांच्या छतावर जाऊन दुर्बिण व टेलिस्कोपद्वारे पृथ्वीप्रमाणेच मानवी वस्तीसाठी पोषक ठरु शकणारा मंगळ ग्रह न्याहाळला. ...
अमेरिकेतील नासा संस्थेने नुकतेच व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅण्ड येथून ‘इक्विसॅट’ या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे नेतृत्व हे पुण्याच्या आनंद ललवाणी या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले आहे. ...
शेतीसाठी भूगर्भातील जलस्रोतांचा अतिवापर होत असल्याने भारतासहित अमेरिकतील कॅलिफोर्निया, मध्य पूर्वेतील देश व आॅस्ट्रेलियाच्या काही भागांत उपलब्ध पाण्याचे प्रमाण चिंता वाटावी इतक्या प्रमाणात घटले आहे. ...