तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती शाळेच्या मुलांची नावे पोहचणार मंगळावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 10:12 PM2019-07-06T22:12:34+5:302019-07-06T22:19:24+5:30

२०२० मध्ये नासातर्फे मंगळाचा अभ्यास करण्यासाठी ‘मार्स रोव्हर २०२०’ पाठविले जाणार असून या यानाच्या एका चीप वर या सर्व विद्यार्थ्यांची नावे असणार आहे.

Children of Landewadi school student name on nasa | तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती शाळेच्या मुलांची नावे पोहचणार मंगळावर

तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती शाळेच्या मुलांची नावे पोहचणार मंगळावर

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासातर्फे निवड : २५ विद्यार्थ्यांची नावे मार्स रोव्हर २०२० द्वारे करणार प्रक्षेपितविद्यार्थ्यांच्या या अंतराळ भरारीमुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतूक

तळेगाव ढमढेरे :  पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी त्यांची नावे थेट मंगळावर कोरणार आहेत. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासातर्फे या शाळेच्या २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रवासाचे बोर्डिंग पासही मिळाले आहे. २०२० मध्ये नासातर्फे मंगळाचा अभ्यास करण्यासाठी ‘मार्स रोव्हर २०२०’ पाठविले जाणार असून या यानाच्या एका चीप वर या सर्व विद्यार्थ्यांची नावे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या या अंतराळ भरारीमुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतूक होत आहे. 
नासाचे मंगळ रोव्हर २०२० हे अंतरिक्ष यान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपवणार आहे. त्यासाठी स्टेनसिल्ड चीपवर आपली नावे पाठवून आपल्या खुना सोडण्याची संधी नासाने जगभरातील नागरिकांना दिली आहे.  नासाच्या संकेत स्थळावर ही नावे नोंदविता येणार आहेत. लांडेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका रेशमा शेख यांनी त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नावे नासाच्या संकेतस्थळावर नोंदवीली होती. या साठी विद्यार्थ्यांचे इमेल आयडीही त्यांनी बनवीले. सर्व विद्यार्थ्यांची या मोहिमेसाठी नोंदनीझाल्याने मेल नासाने त्यांच्या मेल वर पाठवीले असून या प्रकल्पासाठी त्यांची नावे या यानाच्या चीपवर नोंदवीले जाणार असून ती या यानाद्वारे मंगळावर पाठवीली जाणार अहेत. 
अमेरिकेतील अवकाश संशोधन करणारी ‘नासा’ ही संस्था आहे. या संस्थेच्या बाबतीत मुलांना माहिती व्हावी, अवकाश व विविध ग्रहबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे. यादृृष्टीने हा उपक्रम राबवील्याचे मुख्याध्यापिका शेख यांनी सांगितले.  या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी  राजेसाहेब लोंढे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख नानासाहेब वाजे, सहशिक्षिका विजया लोंढ यांचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे. 
चौकट 
नासा मार्फत २०२० मध्ये ‘मार्स रोव्हवर २०२०’ हे यान मंगळाचा अभ्यास करणयसाठी प्रक्षेपित केले जाणार आहे. त्यातील  एका चिपवर विद्यार्थ्यांची  नावे स्टेन्सिल  करून ती मंगळ ग्रहावर पाठवीली जाणार आहेत. यासाठी प्रत्येकाला फ्लाईंग  मिलियन्स पॉइंट मिळणार आहेत. 
   कोट
 नासाच्या मार्स रोव्हर २०२० या मोहिमेत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली हे आमचे भाग्य आहे. लांडे वस्ती सारख्या ग्रामीण भागातील मुलांची नावे अवकाश यांना द्वारे मंगळावर पोहोचणार यावर विश्वासच बसत नाही, असे विद्यार्थ्यांचे पालक आमच्याशी संवाद करताना सांगत आहेत.
          -रेशमा शेख मुख्याध्यापिका  लांडेवस्ती शाळा
चौकट :
काय आहे नासाची मोहिम
मंगळाचा अभ्यास करण्यासाठी पुढच्या वर्षी नासातर्फे मंगळावर मार्स रोव्हर २०२० ही मोहिम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळावर यान पाठवीले जाणा असून या यानाच्या एका चिपवर जगभरातील १० लाख नागरिकांची नावे कोरली जाणार आहे. याची संपूर्ण माहिती नासाचे संकेतस्थळ एमएआरएस.नासा.गीओव्ही यावर दिली आहे. या मोहिमेत एका चिपवर   स्टेनसिल्ड पद्धतीने ही कोरली जाणार आहे. नासाच्या कॅलीफोर्निया येथील पसाडेना जेट प्रोपोशन्सल लॅबोरिटीतल्या मायक्रोडिव्हायसेस लॅबोरिटीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सीलीकॉनच्या चीपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या म्हणजेच ७५ नॅनॉमिटर रूंदित  ही १० लाख नावे नोंदविली जाणार आहेत. अशाच एका छोट्या डेमी आकाराच्या चीपवर ही नावे नोंदवीण्या येणार आहे. मार्स रोव्हर २०२० या यानाद्वारे ती मंगळावर पाठवीली जाणार आहेत. नागरिकांना ३० सप्टेंबर अखेर पर्यंत या मोहिमेसाठी ही नावे पाठविता येणार आहेत. 

Web Title: Children of Landewadi school student name on nasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.