सरकारी रेशन वितरणासंदर्भात नागरिकांच्या काय तक्रारी आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी केली. तसेच, यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणारे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रदेश सचिव संजय धर्माधिकारी यांना यावर १२ मेप ...
बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धनगरात सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
तीव्र आर्थिक कोंडीमुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका तरुणाची प्रकृती सारखी बिघडतच गेली आणि त्याचा करुण अंत झाला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. ...
लॉकडाऊनमध्ण्ये पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मध्ये श्वानांची दहशत वाढली आहे. प्रभागातील भारतनगर, गुजराती कॉलनीत गेल्या आठवड्यात सहापेक्षा अधिक नागरिकांवर श्वानांनी हल्ला चढवून जखमी केले. ...
लॉकडाऊनदरम्यान काही भागांना सवलत देण्यात आली असली तरी संपूर्ण नागपुरात दारू बंदच राहणार आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच नागपूर शहरात दारूबंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनीसुद्धा संपूर्ण नागपूर जिल ...
कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात सतरंजीपुरापाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा व डोबीनगर परिसरात संसर्गाला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने या परिसरातील ३५० नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी डोबीनगर परिसरातील १० ...
शहरातील लॉकडाऊनचा वाढविलेला कालावधी पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. आज पुन्हा नऊ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, यात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच व सात वर्षीय बालकाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १६० वर पोहचली आहे. ...
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांना समाजसेवकांच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांमध्ये रेशन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. काही व्यापारी त्याचा फायदा घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत आहेत. ...