Samit Thakkar arrested for calling Aditya Thackeray a baby penguin | आदित्य ठाकरेंना बेबी पेंग्विन म्हणणाऱ्या ठक्करला अटक, आज कोर्टात हजर होणार

आदित्य ठाकरेंना बेबी पेंग्विन म्हणणाऱ्या ठक्करला अटक, आज कोर्टात हजर होणार

ठळक मुद्देविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अनेकांनी समित ठक्करची पाठराखण केली आहे. अमृता फडणवीस यांनी समितची पाठराखण करताना, राज्य सरकारवर टीका केली

नागपूर - भाजपाचा समर्थक आणि नागपूरचा रहिवाशी असलेल्या समित ठक्करला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना बेबी पेंग्विन म्हटल्यामुळे आणि सातत्याने मुख्यमंत्र्यांविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली हे. समितला राजकोट येथून अटक करण्यात आली असून आज नागपूर न्यायालयात हजर करण्यात येईल. 

नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी जुलै महिन्यात समित ठक्कर विरोधात तक्रार दिली होती. समित ठक्कर ट्विटरच्या माध्यमातून सतत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध मंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करतो. धार्मिक भावना दुखावतील असे मजकूर ट्विट करतो, असे आरोप शिवसैनिकांनी केले होते. त्यानंतर पोलिसांनी  गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलीस समित ठक्करचा शोध घेत असताना समुतला काही अटींवर न्यायालयातून दिलासा मिळत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. तसेच, मुंबईतील व्हीपी रोड पोलीस ठाण्यातही समितवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटरवर समित ठक्करचे हजारो फॉलोवर्स असून सध्या ती संख्या 60 हजारांच्या घरात आहे. तर भाजपचे अनेक मात्तबर नेते सुद्धा समित ठक्करला ट्विटर वर फॉलो करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात त्याचा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अनेकांनी समित ठक्करची पाठराखण केली आहे. अमृता फडणवीस यांनी समितची पाठराखण करताना, राज्य सरकारवर टीका केली. आता तर कोरोना व्हायरस आणि पेंग्विन महासरकार व्हायरस कधी, केव्हा आणि कसे निष्पाप लोकांना आपल्या कचाट्यात घेईल, हे काही सांगता येत नाही, असे ट्विट अमृता यांनी केलं होतं. 

आनंद रंगनाथन यांच्या ट्विटला रिट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणाऱ्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समित ठक्कर या तरुणाला शनिवारी अटक केली आहे. या अटकेनंतर आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत ठाकरे सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. 'पावरलेस' मुख्यमंत्री असे समित ठक्कर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्विट केले होते. यामुळे समितला अटक केली का? असा प्रश्न आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत विचारला. आनंद रंगनाथन यांच्या या ट्विटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महासरकार व्हायरसची उपमाच दिली आहे. "कोरोना व्हायरस आणि पेंग्विन महा सरकार व्हायरस हे दोन्हीही कधी, केव्हा आणि कसे निष्पाप लोकांना आपल्या कचाट्यात घेतील, हे काही सांगता येत नाही. क्वारंटाइन होण्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि नियमित मास्क वापरा. सुरक्षित राहा! गप्प बसा!," असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
 

Web Title: Samit Thakkar arrested for calling Aditya Thackeray a baby penguin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.