Rumors of firing stir up Dharampeth in Nagpur | गोळीबाराच्या अफवेने नागपुरातील धरमपेठेत खळबळ

गोळीबाराच्या अफवेने नागपुरातील धरमपेठेत खळबळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : धरमपेठ परिसरात शनिवारी सायंकाळपासून गोळीबार झाल्याच्या अफवेने चांगलीच खळबळ उडाली. याबाबत एका तरुणाने धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केल्याचेही सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळच्या दरम्यान धरमपेठेतील बटुकभाई ज्वेलर्सच्या समोर कारमध्ये असलेल्या एका मुलीला बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवल्याची अफवा सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला होता. गर्दीही झाली होती. पोलिसांनी तपास केला असता ती खेळण्याची बंदूक असल्याचे सांगण्यात आले. मात्र पुढे काहीही निष्पन्न झाले नाही. याबाबत अंबाझरी पोलिसांनीही कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. पुढे ही घटना बनावट (फेक) असल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने एका तरुणाने धंतोली पोलीस स्टेशनमध्ये समर्पण केल्याचे आणि हा तरुण धरमपेठेतील याच घटनेतील असल्याचीही माहिती समोर आली. मात्र धंतोली पोलिसांनीही याबाबत काही सांगितले नाही. त्यामुळे घटना फेक होती, अफवा होती की आणखी काही, या चर्चा रात्री उशिरापर्यंत चालल्या होत्या.

Web Title: Rumors of firing stir up Dharampeth in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.