नागपुरात जीवन प्राधिकरणच्या अभियंत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 10:32 PM2020-10-26T22:32:40+5:302020-10-26T22:35:26+5:30

Jivan Pradhikaran Engineer, Committed suicide, Nagpur News जीवन प्राधिकरण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेले दिनेश सुधाकर देशकर (वय ५२) यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या आवारातील विहिरीत आढळून आला. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास उघड झालेल्या या घटनेनंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Jeevan Pradhikaran engineer commits suicide in Nagpur | नागपुरात जीवन प्राधिकरणच्या अभियंत्याची आत्महत्या

नागपुरात जीवन प्राधिकरणच्या अभियंत्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देघराच्या आवारातील विहिरीत आढळला मृतदेह : उलटसुलट चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जीवन प्राधिकरण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेले दिनेश सुधाकर देशकर (वय ५२) यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या आवारातील विहिरीत आढळून आला. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास उघड झालेल्या या घटनेनंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या संबंधाने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

राजीवनगर सोमलवाडा येथे राहणारे देशकर जीवन प्राधिकरण विभाग, दर्यापूर येथे कार्यरत होते. त्यांना पत्नी, मुलगा (वय २४) आणि मुलगी (वय १९) असून, वृद्ध आईवडिलांसह ते राहत होते. त्यांच्या घराच्या आवारात विहीर आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांचा मृतदेह घरच्यांना विहिरीत आढळून आल्याने घरची मंडळी घाबरली. माहिती मिळाल्यानंतर दिनेश यांचे मोठे बंधू राजेश सुधाकर देशकर (वय ५७) पोहचले. सोनेगावचे हवालदार रमेश रोकडे आणि सहकारीही पोहचले. त्यांनी चौकशी केली असता देशकर यांनी आत्महत्येपूर्वी कसलीही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, कार्यालयीन तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला.

बदली, सुट्या अन्..!

सूत्रांच्या माहितीनुसार, दर्यापूरला कार्यरत असलेल्या देशकर यांची नुकतीच अंमळनेर (जळगाव) येथे बदली झाली होती. ती रद्द व्हावी म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते प्रचंड दडपणात आले होते. त्यांनी सुट्याही घेतल्या होत्या. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात् सोमवारी २६ ऑक्टोबरला नव्या ठिकाणी कर्तव्यावर जाण्याची त्यांनी तयारी चालवली होती. त्यासाठी सकाळपासून धावपळ सुरू असताना त्यांनी हा आत्मघातकी निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

Web Title: Jeevan Pradhikaran engineer commits suicide in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.