लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. Read More
आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसून, समाजव्यवस्थेतील वंचित आणि दुर्बल घटकांना सामाजिक समता आणि न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेली तरतूद आहे ...
Laxman Hake Car Attacked: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली. हल्ला कसा करण्यात आला, याबद्दल हाकेंनी माहिती दिली. ...
Laxman Hake's Car Stone Pelting: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अज्ञात तरुणांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. ...
Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. ४० जणांनी अचानक लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात हाकेंचा सहकारी गंभीर जखमी झाले. ...