कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली नाही. ही अभिनेत्री शेवटची 'फोन भूत' चित्रपटात दिसली होती. ...
Katrina Kaif on break up with Ranbir Kapoor : रणबीर व कतरिनाचं रिलेशनशिप कधीच संपलं... आता दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी आहेत. पण नीतू कपूर यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या नात्याची चर्चा होतेय... ...
Neetu Kapoor : दोन दिवसांपूर्वी नीतूंनी केलेली ही पोस्ट पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. नेटकऱ्यांनी नीतू कपूर यांच्या या पोस्टचा संबंध रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण व कतरिना कैफशी जोडला होता. आता... ...