भेदक नजर, हातात बंदूक... टायगर 3 मधला सलमान खानचा कडक लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 03:32 PM2023-10-11T15:32:51+5:302023-10-11T15:42:39+5:30

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने 'टायगर 3' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Salman Khan seen in an action packed avatar in brand new poster of Tiger 3 | भेदक नजर, हातात बंदूक... टायगर 3 मधला सलमान खानचा कडक लूक

Salman Khan

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'टायगर 3' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरही काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये सलमान खानचा कडक लूक पाहायला मिळतोय.


सलमानने सोशल मीडियावर चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये टायगरची भेदक नजर,  हातात बंदूक दिसत आहे. यासोबतच त्यांच्या मागे पोलिसांची अनेक वाहनेही दिसत आहेत. पोस्टर शेअर करताना सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले, 'टायगर आ रहा है, रेडी हो जाओ'.

 याआधी सलमानने कतरिनाचा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये ती हातात बंदूक घेऊन गोळ्या झाडताना दिसत आहे.  पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे. 

पुन्हा एकदा टायगर आणि झोयाची लव्हस्टोरी आणि अ‍ॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.  मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.  सलमान खानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. 'एक था टायगर' (2012) आणि 'टायगर जिंदा है' (2017) बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते.

Web Title: Salman Khan seen in an action packed avatar in brand new poster of Tiger 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.