कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Merry Christmas : 'टाइगर ३' चित्रपटाचा ग्रॅण्ड सक्सेस एन्जॉय करत असलेली कतरिना कैफ लवकरच 'मेरी ख्रिसमस' चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ...
Welcome Movie : 'वेलकम' सिनेमाला रिलीज होऊन १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, मल्लिका शेरावत, परेश रावल, अनिल कपूर आणि नाना पाटेकर ...
Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण ८ शोचा लेटेस्ट प्रोमो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी शोमध्ये कियारा आडवाणी आणि विकी कौशल हजेरी लावणार आहेत. ...
Katrina Kaif Merry Christmas : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती अभिनीत मेरी ख्रिसमस चित्रपट पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. श्रीराम राघवन यांच्या चित्रपटात कतरिना आणि विजय पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ...