बॉलिवूडची 'सुपरहॉट' अभिनेत्री CSK ची ब्रँड ॲम्बेसेडर? MS Dhoniचा संघ होणार अधिक फेमस 

येत्या काही दिवसांतच आयपीएल २०२४ च्या हंगामाला सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:11 PM2024-02-15T16:11:20+5:302024-02-15T16:13:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 bollywood actress katrina kaif set to be appointed brand ambassador of chennai super kings | बॉलिवूडची 'सुपरहॉट' अभिनेत्री CSK ची ब्रँड ॲम्बेसेडर? MS Dhoniचा संघ होणार अधिक फेमस 

बॉलिवूडची 'सुपरहॉट' अभिनेत्री CSK ची ब्रँड ॲम्बेसेडर? MS Dhoniचा संघ होणार अधिक फेमस 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Katrina Kaif brand ambassador of CSK : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल हे नक्की... मागच्या पर्वात निवृत्तीच्या चर्चांवर टोलेबाजी करत धोनीने चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) आणखी एक जेतेपद जिंकून दिले होते. यंदाच्या पर्वातही त्याचीच हवा पाहायला मिळणार आहे, परंतु यावेळी CSKच्या प्रसिद्धीला ग्लॅमरचा तडका लागणार आहे. बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री कॅटरिना कैफची चेन्नई सुपर किंग्सच्या ब्रँड ॲम्बेसिडर पदी नियुक्ती करण्यात येणार आहे. 

हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी कॅटरिना तिच्या ग्लॅमरने क्रिकेटची प्रसिद्धी आणखी वाढवणार आहे.  कॅटरिनाच्या नियुक्तीवर CSK ने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला तमीळ फिल्म इंडस्ट्रीमधील बड्या कलाकरांनी नेहमीच सपोर्ट केला आहे. आता हिंदी मनोरंजन विश्वातील सुंदर अभिनेत्रीचं नाव या टीम बरोबर जोडण्यात येतंय. कॅटरिना कैफ याआधीही आयपीएलदरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये दिसली आहे. अभिनेत्री  याआधीही काही सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सपोर्ट करताना दिसली होती. मात्र, आता कॅटरिना  कैफचे नाव चेन्नई सुपर किंग्जशी जोडले जात आहे. 

संघाचा इतिहास - 

चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनी प्रत्येक प्रसंगी आपला संघ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करत आहे. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ विजेतेपद पटकावले आहेत. यामध्ये २०१०, २०११, २०१८,२०२१ आणि २०२३ च्या आयपीएल सीझनचा समावेश आहे. आता २०२४ मध्ये आयपीएलचा १७ वा हंगाम लवकरच सुरु होणार आहे त्यामुळे क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Web Title: IPL 2024 bollywood actress katrina kaif set to be appointed brand ambassador of chennai super kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.