आरमोरीपासून ९ किमी अंतरावर असलेल्या सालमारा ते कराडी या जंगल परिसरात वनविकास महामंडळाने तोडून ठेवलेले जळाऊ लाकूड बिट जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांचे लाकूड जळाले असून वनविकास ...
गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांट प्रकरणात अर्जुनी-मोरगावच्या तहसीलदारांनी केलेली जप्तीची कारवाई ही देखावा असून मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर या पद्धतीची असल्याचा आरोप केला जात आहे. जप्तीची कारवाई झाली असली तरी प्लांट मात्र अद्यापही सुरु ...
जालना जिल्ह्यातील जास्त जंगल असलेल्या भागात प्राणी गणना करण्यात आल्याचे ते म्हणाले. ही गणना करताना जाफराबाद तालुक्यातील खडकपूर्णा बॅक वॉटर परिसरात तीन अस्वलांचे दर्शन घडल्याचे सांगितले. ...
बुध्द पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन विभाग व अन्य प्राणी संघटनेच्या मदतीने वन्यप्राण्यांचे सनियंत्रण व प्रगणना करण्याचे काम ट्रॅप कॅमऱ्याच्या माध्यमातून केले गेले. त्या आधारे मिळालेल्या आकडेवारीनुसार नायगांव अभयारण्य व अन्य ठिकाणी तब्बल १२ हजार ७७४ ...
पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर जास्त दिसून येतो. मात्र दिवसेंदिवस शहरीकरण होत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे ते शेतातील दाट पिकांमध्ये वास्तव्य करीत आहेत. अशी शेती मानवी वस्तीलगतही असते. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीक ...
मागील वर्षी काही तेंदूपत्ता कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याची मजुरी व रॉयल्टी दिली नाही. हा अनुभव लक्षात घेता यावर्षी तेंदूपत्त्याची मजुरी मजूर नगदी मागत आहेत. ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार दिले असले तरी ग्रामसभा स्वत: तेंदूपत्त्याचे संकलन करीत ...
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर प्रकल्पाची ओळख. परंतु, याच प्रकल्पाच्या बफर झोनचा विषय मागील दोन वर्षांपासून शासन दरबारी रेंगाळला आहे. अद्यापही या विषयी कुठलाही शासन निर्णय झाला नसून वन्य प्राणी मित्रांचे शासनाच्या भूमिकेडे लक्ष लागून ...