हिरवळीच्या खतामध्ये मुख्यातः झाडांचा पाला, फांद्या आणि वनस्पतींचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. बोरू, धैंचा, मुग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरून जमिनीत गाडली जातात. ...
युरिया या नत्रखतांचे नाव माहित नाही, असा शेतकरी शोधून सापडणार नाही. या खताचा वापर सर्वत्र प्रचलित असून लोकप्रिय झाला आहे. अल्पावधीमध्येच पिकांची होणारी जोमदार वाढ, हिरवागार तजेलदारपणा आणि उत्पादनात होणारी भरघोस वाढ शेतकरी दृष्टीआड करू शकत नाही. ...
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जवळपास चार लाख एकर जागेवर हापूस आंब्याची लागवड आहे. देशी बाजारपेठेसोबत विदेशी बाजारात हापूसला मोठी मागणी आहे. आधुनिकतेचा अभाव कोकणच्या हापूससमोर कायम राहिलेला आहे. ...