यंदाच्या वर्षी वरूणराजाने आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने आतापर्यंत नाशिक विभागात एकूण १६८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के पाऊस जादा झाला आहे. ...
जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
संपूर्ण विदर्भात कापूस, सोयाबीन व धान पिकांची अतिवृष्टीमुळे प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. ...