The Wet drought challenges the new government | नव्याने येणाऱ्या सरकारसमोर ओल्या दुष्काळाचे आव्हान
नव्याने येणाऱ्या सरकारसमोर ओल्या दुष्काळाचे आव्हान

मुंबई : राज्यात एकीकडे सत्तास्थापनेच्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहेत.पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अशा संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारपुढे ओला दुष्काळाचे आव्हान असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. युती करून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपचे १०५ तर शिवसेनेच्या ५६ उमेदवार निवडून आली आहेत. मात्र सत्तेचा फॉर्म्युल्यामुळे या दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. त्याचप्रमाणे भाजपकडून हव तसा प्रतिसाद मिळाला नाही तर, शिवसेना राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन सरकार स्थापना करण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जात आहे. मात्र सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे.

राज्यातील अनेक भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून ओला दुष्काळजन्य परिस्थती निर्माण झाली आहे. सर्वच पिके खरिपाची उध्वस्त झाली असल्याने शेतकऱ्यांचे दिवाळीत दिवाळे निघाले. परतीच्या पावसाने मका, बाजरी, तुरी, कपाशी पिकांचे करोडो रुपयांचे अतोनात नुकसान केले आहेत. शेतात पाणी तुंबल्याने मका व बाजरीच्या कणसांना कोंब फूटले तर कपाशीचे पिक पाण्यामुळे पिवळी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकरी मदतीची गरज निर्माण झाली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. प्रशासनाकडून पिंकाचे पंचनामे करण्यास सुद्धा सुरवात झाली असली तरीही राज्यातील नवीन सरकार स्थापना होईपर्यंत मदत मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात नव्याने आलेल्या सरकारकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन कश्याप्रमाणे मदत मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: The Wet drought challenges the new government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.