धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
nanaji deshmukh krishi sanjivani yojana नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली ...
श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याचा परिणाम पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर होणार का? याकडेही लक्ष आहे. ...