धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Sanjay Raut News : एकीकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महाविकास आघाडीकडून मात्र त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला जात आहे. ...
Anil Deshmukh : धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर देणे अनिल देशमुख यांनी टाळले आणि चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगितले. ...
Renu Sharma And Dhananjay Munde : रेणूच्या वकिलांनी करिअर घडवण्याचे आमिष दाखवून मुंडे यांनी तिचे लैंगिक शोषण केले असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड देखील करण्यात आले असल्याची माहिती दिली. ...
Rape Allegation on Dhananjay Munde : केंद्रे यांनी धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा, तिची बहीण रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. वेगवेगळ्या वेळी अनेकदा त्रास देण्याचा प्रकार घडला. ...