कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, धनंजय मुंडे प्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 03:06 PM2021-01-15T15:06:44+5:302021-01-15T16:41:28+5:30

Anil Deshmukh : धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर देणे अनिल देशमुख यांनी  टाळले आणि चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगितले.

No minister is bigger than the law, Home Minister Anil Deshmukh reaction in Dhananjay Munde case | कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, धनंजय मुंडे प्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया 

कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, धनंजय मुंडे प्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया 

Next
ठळक मुद्देधनंजय मुंडे  यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर बोलताना कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, कायद्यासमोर सर्व समान असतात. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

कायदा कुणासोबतही भेदभाव करणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई करु. कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. सध्या धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे. यामधून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले म्हटले आहे. याचबरोबर, या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर देणे अनिल देशमुख यांनी  टाळले आणि चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगितले.

दरम्यान, धनंजय मुंडे  यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारीला फेसबुकवर संबंधित महिलेने केलेले आरोप ब्लॅकमेलिंग करणारे आणि खोटे आहेत, असे सांगत करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई - शरद पवार
धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सौम्य भूमिका घेतली आहे. महिलेचे आरोप ऐकून मी त्यासाठी गंभीर शब्द वापरला होता. मात्र, मी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर अनेकांनी त्याच महिलेवर अतिशय गंभीर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यात तथ्य आढळल्यास पक्षाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असं शरद पवार म्हणाले. 

धनंजय मुंडें यांचा तूर्तास राजीनामा नाही
गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप आणि त्यांचा राजीनाम्यावर महत्वाची चर्चा करण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचे सांगण्यात येते. तर पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच, मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. 

धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळं वळण
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार महिला ही ब्लॅकमेलर आहे, तिने आमच्यासोबतही अशाचप्रकारे हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी समोर आले आहेत, धनंजय मुंडे यांनीही महिला ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत आहे, तिने माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केलेल्याचे अनेक मेसेज आहेत असा दावा केला होता, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

Web Title: No minister is bigger than the law, Home Minister Anil Deshmukh reaction in Dhananjay Munde case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.