धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
औरंगाबादेत दंगल घडणार असा गुप्तचर खात्याने दिलेला लेखी अहवाल कोणत्या अधिकाऱ्याने दडपला, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे केली. ...
ऐनवेळी रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच तोंडघशी पडली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आठ दिवसातच आपल्या भावाला लागोपाठ दुसरा धक्का देत म ...
अवघ्या पाच दिवसांत पडद्यामागे झालेल्या वेगवान राजकीय हालचालींनंतर रमेश कराड यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ...
राजकीय विश्लेषण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी मंत्री सुरेश धस यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाचा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या जागेवर परिणाम झाला असून, त्यातूनच राष्ट्रवादीचे मावळते आ़ बाबाजानी दुर्राणी यां ...
राज्यातील महत्वाचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज होणार आहे.याबाबत राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बैठकीनंतरच्या सभेत नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. आगामी लोक ...