धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Eknath Khadse, NCP News: भाजपानं केलेल्या मेगाभरतीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मेगागळती लागण्याची चिन्हे आहेत, एकनाथ खडसेंनी ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर तालूक्यातील वाण धरण तीन वर्षानंतर १०० टक्के भरले. त्यामुळे शनिवारी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले. ...
पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयांची थकहमी राज्य सरकारने मंजूर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात श्रेयाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येते ...
मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मणी मिळणे बाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योगासाठीच्या योजना बाबत झालेल्या आढावा बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते. ...
सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता तपासली जाईल. सफाई कामगारांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत, असेही मुंडे म्हणाले. ...
एमपीएससी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा काठावर आहेत त्यांच्यावर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अन्याय होऊ नये, याची काळजी घेऊन निर्णय घेण्यात यावा असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ...