गिरणा पाटबंधारे विभागामार्फत बुधवारी गिरणा जामदा उजव्या कालव्याला पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून या पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा अभियंता चव्हाण यांनी केले आहे. ...
राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, मेट्रो, विमानतळ यांसारख्या विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येते. ...
गेल्या काही दिवसांपासून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली जात होती. ज्यावर आता मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पुढील पाच दिवसांत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ग्रामीण भागासाठी मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील ६० दिवसांसाठी हे आवर्तन राहणार असून सुमारे साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ...
खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णतः वाया गेला असून शेतकरी त्या संकटातून अजूनही बाहेर आला नाही. रब्बी हंगामात तरी शासन वेळेवर पिकांसाठी पाणी देईल असे वाटले होते; परंतु रब्बी हंगामातील पिके उगवली तरी उर्ध्व मानार प्रकल्पातून अजूनही पाणी सोडले नाही. त्यामुळे ...
यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट आल्यामुळे शेतीतील खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे. नुकसानीमुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, पिकांना पाणी देता यावे यासाठी निम्न दुधना प्रकल् ...