Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
मोहिनीदेवी रुंग्टा बालमंदिर शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची वेशभूषा केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन लता आंडे, नेहा सोमठाणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री बडवे यांनी केले. ...
आला रे आला, गोविंदा आलाच्या गजरात कणकवली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंड्या फोडण्यात आल्या. या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. तर गोविंदा पथकांच्या उत्साहाला जणू उधाणच आले होते. ...
गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा...अशा विविध हिंदी मराठी गीतांच्या तालावर ठेका धरत शेकडो गोविंदा आणि गोपिकांच्या उपस्थितीत कृष्णनगरला दहीहंडीचा उत्सव रंगला. शनिवारी सायंकाळी अनेरी मकवाना या गोपिकेने ही दहीहंडी फोडली. ...
शहर व परिसरातील मुख्य चौकांमध्ये शनिवारी (दि.२४) ‘एकीकडे गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी मे’ अशी वेगवेगळी गीते, तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्याची चाललेली धडपड अशा उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला उत्साहात ...
श्रीकृष्णनगर येथील कृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवारी मध्यरात्री कृष्णजन्माष्टमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कृष्ण जन्मानंतर शेकडो उपस्थित भाविकांनी कृष्ण भगवान की जय हो, राधे-कृष्णा गोपाळ-कृष्णा जयघोष ...
जय कन्हैया लाल की, च्या जयघोषात मुक्तिधामसह विविध मंदिरात व घराघरांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...