...जय कन्हैयालाल की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:29 AM2019-08-25T00:29:29+5:302019-08-25T00:29:58+5:30

जय कन्हैया लाल की,  च्या जयघोषात मुक्तिधामसह विविध मंदिरात व घराघरांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 ... of Jai Kanhaiyalal | ...जय कन्हैयालाल की

...जय कन्हैयालाल की

googlenewsNext

नाशिकरोड : नंद के घर आनंद भयो,
जय कन्हैया लाल की,
हाथी घोडा पालखी,
जय कन्हैया लाल की,  च्या जयघोषात मुक्तिधामसह विविध मंदिरात व घराघरांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मुक्तिधाम, जेलरोड नवरंग कॉलनी राधाकृष्ण मंदिर, दत्तमंदिररोड गाडेकर मळा श्री साईबाबा मंदिर, श्री चक्रधर निवास, श्री घळसासी दत्तमंदिर, बिटको महाविद्यालयमागील हांडे मळा श्री एकमुखी दत्त मंदिर आदी मंदिरांमध्ये शुक्रवारी सायंकाळनंतर भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम मार पडले.
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मुक्तिधाममध्ये मध्यरात्रीपर्यंत सुमधुर भजनांचा कार्यक्रम पार पडला. मध्यरात्री मुक्तिधामचे ट्रस्टी हिरालाल चौव्हाण, नटवरलाल चौव्हाण, मोहन चौव्हाण, जगदीश चौव्हाण, विजय चौव्हाण, आदित्य चौव्हाण आदींच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी परिसरातील भाविकांनी, महिलांनी ‘गोपाल बोलो हरि गोविंद बोला, श्रीकृष्ण भगवान की जय’च्या जयघोष करत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांना राजू कुलकर्णी, सुरेश मानकर, ज्ञानेश्वर यंदे, तुकाराम निमसे आदीनी प्रसादाचे वाटप केले.
गाडेकर मळा येथील सुधाकर महानुभाव यांच्या चक्रधर निवास व पंचक येथील सागर भोजने यांच्या घरी रितीरीवाजानुसार पूजा मांडण्यात आली. गाडेकर मळा श्री साईबाबा मंदिर, देवळालीगांव श्री दत्तमंदिर, घळसासी श्री दत्तमंदिर आदि मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात पाळणा सजविण्यात आला होता. तसेच घराघरामध्ये लंगडा बाळकृष्ण व श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली.
देवळालीगाव गाडेकर मळा येथील महानुभाव कुटुंबीयांच्या चक्रधर निवासमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त शनिवारी आयोजित धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी बाल गोपाळांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांचे स्वागत सुधाकर मानभाव, सुरेश मानभाव, अरुण मानभाव, संजय मानभाव, विजय मानभाव, चंदू महानुभाव आदींनी केले.
गोकुळाष्टमीनिमित्त विश्वशांतीसाठी विष्णुसहस्त्रनाम पठण
गीता फाउंडेशन, मिरज यांच्यातर्फे विश्वशांतीसाठी १२ कोटी विष्णुसहस्त्रनाम पठणाचा संकल्प करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातून १ जानेवारीपासून वैयक्तिक स्तरावर आणि सामुदायिकरीत्या आवर्तनांना सुरु वात झालेली आहे. नाशिक येथे गोकुळअष्टमीनिमित्त विश्वशांतीसाठी विष्णुसहस्त्रनाम पठण करण्यात आले.
दिलीप आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. २३) देशस्थ-ऋग्वेदी ब्राह्मण कार्यालय, तिडके कॉलनी येथे संध्याकाळी नाशिकमधील ३११ भक्तांनी व साधकांनी एकत्र येऊन विष्णुसहस्त्रनाम पठण केले. विजय जोशी आणि सहकाऱ्यांनी मंत्रघोषात मंगलाताई पिसोळकर व चंद्रकांत पिसोळकर या दाम्पत्याने पूजन करून या विश्वशांतीसाठी केलेल्या पाच वेळा विष्णुसहस्त्रनामाच्या आवर्तनास सुरुवात झाली. केशवराव दौंड, प्रदीप कुलकर्णी, विलास आपटे यांच्या हस्ते गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्रीपाद गलगले, रमेश बापट, मंगला पिसोळकर, केशव दौंड, सुनीता शिंदीकर, चारु शीला भगूरकर यांचे सहकार्य लाभले.
व्हिजन कीड््स शाळेत दहीहंडी
जेलरोड येथील व्हिजन किड्स शाळेत श्रीकृष्ण जन्मोत्सव दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. व्हिजन अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. अंकिता मुदलीयार, मुख्याध्यापिका प्रिया आठवले यांच्या हस्ते बाळकृष्णाची पूजा करण्यात आली. यावेळी राधा-कृष्णाच्या वेशभुषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने दहीहंडी फोडली. यावेळी विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करून श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीची माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title:  ... of Jai Kanhaiyalal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.