‘गोविंदा आला रे आला...’चा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:28 AM2019-08-27T00:28:02+5:302019-08-27T00:28:43+5:30

मोहिनीदेवी रुंग्टा बालमंदिर शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची वेशभूषा केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन लता आंडे, नेहा सोमठाणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री बडवे यांनी केले. यावेळी सुरेखा मालफाटक, आरती मोकाशी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 'Govinda aa ray aa ...' | ‘गोविंदा आला रे आला...’चा जल्लोष

‘गोविंदा आला रे आला...’चा जल्लोष

googlenewsNext

नाशिक : मोहिनीदेवी रुंग्टा बालमंदिर शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची वेशभूषा केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन लता आंडे, नेहा सोमठाणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री बडवे यांनी केले. यावेळी सुरेखा मालफाटक, आरती मोकाशी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सेंट लॉरेन्स हायस्कूल
सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी दहीहंडीचे कागदी चित्रे रंगविली. विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफित दाखवून श्रीकृष्णाचे महान कार्य व त्याच्यामध्ये असलेले आदर्श गुण समजावण्यात आले. शालेय शिक्षकवृंदांनी स्वत: श्रीकृष्ण जन्माची व त्याच्या उत्तम गुणांचे सादरीकरण करणारी नाटिका वेशभूषा धारण करून सादर केली.
वाघ गुरुजी शाळा
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर व आदर्श शिशु विहार या शाळेत गोपाळकाला दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक पुष्पा लांडगे यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत आल्या होते. विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आला व गौळणी अशा विविध गाण्यांवर नृत्य, टिपरी व फुगड्या खेळून आपला उत्साह साजरा केला. वर्षा वाघ यांनी गोकुळाष्टमीची माहिती सांगितली. कार्यक्रमास रंजना घुले, कल्पना पाटील, वैशाली सूर्यवंशी, माधुरी धोंडगे, मनीषा जाधव, सीमा भामरे, अर्चना देवरे, मोहिनी निंबाळकर, शीला थेटे, कविता आगळे, वैशाली गावित आदी शिक्षक उपस्थित होते.
अंबड येथील शाळा
मनपा शाळा क्र.७७ (मुले) अंबड येथे गोपाळकालानिमित्त दहीहंडी उत्सव शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय कवर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका नीलिमा फलके यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेतील बालगोपाळानी राधा-कृष्ण, सुदामा, त्यांचे सवंगडी यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे नियोजन सुनील बोंडे, राजाराम चौरे अर्चना बोंडे, मंगला सोनवणे, चंद्रकला बागुल, रूपाली चव्हाण, वैशाली क्षीरसागर, सुनील सोनवणे, यांनी केले होते.
विद्याप्रबोधिनी प्रशाला
नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जन्माष्टमीचा पारंपरिक उत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला. यावेळी विद्यार्थी राधाकृष्णाची वेशभूषा करून आले होते. विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. मुख्याध्यापक जयासुधा नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.
विश्वासनगर शाळा, सातपूर
विश्वासनगर येथील महानगरपालिकेच्या शाळा क्र मांक २४ मध्ये दहीहंडीचा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी कृष्णाचा वेषात, तर मुली राधाचा वेष परिधान करून आलेले होते. सतीश भांबर यांनी दहीहंडी सणाची माहिती सांगितली. याप्रसंगी मोहन चौधरी, प्रकाश शेवाळे, नितीन पालवी, उज्ज्वला एखंडे, ज्योती गर्दे, अनिता शिराळे, स्वाती फटांगरे, मीनाक्षी, शिवाजी शिंदे उपस्थित होते.
एकलहरे जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी उत्साहात
माडसांगवी रेल्वेगेट जिल्हा परिषद शाळेत जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगोपालांनी राधा-कृष्णाची वेशभूषा करून दहीहंडीच्या कार्यक्र मात सहभाग घेतला. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, संजय पेखळे, जालिंदर पेखळे, रंगनाथ कहांडळ, रेखा दीपक, दत्तात्रय गायकवाड, सोमनाथ पेखळे, उषा अपसुंदे आदी उपस्थित होते.

Web Title:  'Govinda aa ray aa ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.