संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जगभरात पसरलेल्या कोरोनाने आत अर्थव्यवस्थेबरोबरच कुटुंबव्यवस्थेवर परीणाम करण्यास सुरवात केली आहे.बारामती शहरात कोरोनाची तपासणी करण्यास नकार देणा-या पतीवर विळ्याने हल्ला करण्याची घटना बारामती शहरात गुरुवारी(दि २६) घडली आहे. ...
जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे. ...
अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडा विनाकारण रस्त्यावर येऊ नका, असे आवाहन पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. दुचाकीस्वारांना केवळ एकावेळेस १०० रुपयांचे पेट्रोल देण्याच्या सुचनाही पेट्रोलपंपचालकांना दिल्या गेल्या आहेत. ...
कोरोना विषाणू हा सर्वप्रथम ज्याची रोगप्रतिकारक्षमता अत्यंत कमी असते, त्यालाच बाधतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल, असे अन्न खाऊ नये व देऊ नये, ही काळजी घेणे गरजेचे आहे. ...
रोजगाराच्या शोधात दोन महिन्यापूर्वी गोवरी येथे आलेले मजूर राज्यात संचारबंदी असल्याने येथे अडकल्याने त्यांचा सध्यातरी गावाला जाण्याचा मार्ग धूसर झाला असून साहेब,आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना......असा आर्त टाहो या मजुरांनी प्रशासनाला केला आहे. ...